“संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने संजीवनी कोविड केअर सेंटर येथे ४० ऑक्सिजन बेडची सुविधा सुरू..!!”

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्वत्र रुग्णांची होणारी दुरावस्था पाहता आत्मा मालिक शैक्षणिक संकुल येथे सुरु असलेल्या संजीवनी कोविड केअर सेंटरमध्ये २० ऑक्सिजन सिलेंडर सुविधा असणारे बेड

आणि २० कॉन्सनट्रेटर सुवीधायुक्त बेड अशी एकूण ४० ऑक्सिजन बेडची सुविधा कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या उपस्थितीत सुरू झाली असून यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे,आवश्यकतेप्रमाणे याच सुविधा अधिक पटीने वाढवण्यात येणार आहेत अशी प्रतिक्रिया विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली आहे..!!

या प्रसंगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री.आप्पासाहेब दवंगे,अमृत संजीवनीचे चेअरमन श्री.परागजी संधान,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,शहराध्यक्ष डी.आर.काले,उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे,नगरसेवक सत्येन मुंदडा,प्रमोद नरोडे,सुशांत खैरे,डॉक्टर जाधव,पत्रकार बांधव आदिंसह विविध मान्यवर उपस्थित होते..!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *