रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी चितळी येथील न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली व विद्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे अध्यक्ष आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी दि.२६ ऑगस्ट रोजी चितळी येथील न्यू इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाला भेट दिली व विद्यालयाच्या कामकाजाची माहिती घेतली. तसेच यावेळी नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप (एन.एम.एम.एस.) परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या कु. सृष्टी बाबासाहेब वाघ हिचा आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी गौतम सहकारी बँकेचे चेअरमन बाबासाहेबजी कोते, गंगाधरजी चौधरी, दिलीपजी चौधरी, श्रीरामपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मधूकरजी साळवे, अण्णासाहेबजी कोते, अशोकरावजी वाघ, बाळासाहेबजी चौधरी, शंकररावजी चौधरी, दत्तात्रयजी जगताप, नितीनजी वाकचौरे, बाबासाहेबजी वाघ, प्राचार्य आर.आय. बर्डे, अरुणजी रुपवते, पी.ए. धनवटे, श्री पिलगर, ए. एस. अरगडे, एस.के.शिंदे, पी.ए. बर्डे, ए. सी. झुराळे, एस.एस. राहणे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *