सुनील फंड यांची महाराष्ट्र धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या महासचिव पदी निवड…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
सुनील फंड यांची महासचिव पदी निवड
महाराष्ट्र परिट धोबी सेवा मंडळाच्या राज्य कार्यकारिणीच्या महासचिव पदी निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष खंडेरावजी कडलग यांच्या व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या सर्वानुमते जाहीर करण्यात आले.
सुनील फंड यांनी कोपरगाव परिट धोबी सेवा मंडळाचे शहराध्यक्षपद दहा वर्ष भुषविले.त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदी सात वर्ष राहुन
विविध उपक्रम राबविले.समाजहितासाठी समाज उपयोगी कामे खुप केली.त्यांच्या प्रयत्नाने कोपरगाव शहरात २००४पासुन पाच गुंठे क्षेत्रावर गाडगेबाबा सांस्कृतिक भवन उभारण्यात प्रगती पथावर आहे.
विशेषतः कोपरगाव तालुका परिट धोबी सेवा मंडळाचे सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन अहिल्यानगर‌ जिल्हात‌ सर्वात मोठं राष्ट्रसंत गाडगेबाबा सांस्कृतिक भवन उभारण्यात येणार आहे.त्याठिकाणी‌ गोरगरिबांना अल्पदरात साखरपुडा,लग्न प्रसंगी देण्यात येते.
पाच वेळा विविध सामाजिक संस्थांकडून समाजभूषण पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात आले .
राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या सुनील फंड यांनी कोपरगाव तालुक्यात स्वतःचं अस्तित्व तयार करून
कोपरगाव तालुक्यात साईगाव पालखी सोहळा, मुंबादेवी तरुण मंडळाचे वतीने गेल्या तीन वर्षांपासून१४८०मुलींनां मर्दानी खेळ लाठी काठी तलवार बाजी, दांडपट्टा खेळाची सुरुवात केली.आजही अविरतपणे चालू आहे.
करोना काळात दोन महिने साईगाव पालखी सोहळाचे वतीने २५००जणांनां रोज २वेळा घरपोहच जेवणाची डबे पोहोचवले.
या नावाने ओळख निर्माण केली आहे.
कोपरगाव तालुक्यात समाजाच्या महिलांना आदर्श माता पुरस्कार, युवक उद्योजक, समाजभूषण पुरस्कार आदी पुरस्काराने गौरविण्याचा संकल्प आहे.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *