कोपरगांव पिपल्स बँकेच्या अध्यक्षपदी सुनिल शांतीलाल बंब…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगांव पिपल्स को-ऑप. बँकेच्या अध्यक्षपदी सुनिल शांतीलाल बंब यांची एकमताने निवड करण्यात आली. दि.२९.०४.२०२५ रोजी कोपरगांव येथील सहकार खात्याचे सहाय्यक निबंधक श्री. ठोंबळ साहेब यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या सभेत वरील निवड करण्यात आली. अध्यक्ष पदाची सुचना अतुल धनालाल काले यांनी मांडली त्यास धरमकुमार माणकलाल बागरेचा यांनी अनुमोदन दिले. चेअरमन पदा करीता एकच अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे श्री. ठोंबळ साहेब यांनी जाहीर केले.
अध्यक्ष सुनिल बंब हे गेल्या १६ वर्षापासुन बँकेच्या संचालक पदावर कार्यरत असुन त्यांनी या कालावधीत बँकेचे उपाध्यक्षपद‌ही भुषविलेले आहे. एकंदरीत बँकींग क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीमत्व लाभल्यामुळे यापुढील काळातही त्यांच्या अनुभवाचा बँकेस निश्चित फायदा होईल असे गौरवोदगार मावळते चेअरमन राजेंद्र शिंगी यांनी काढले.

तत्पूर्वी राजेंद्र शिंगी यांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला. बँकेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी वर्ग यांना सोबत घेऊन बँकेच्या चेअरमनपदाची धुरा अत्यंत उत्तमरितीने पेलून बँकेची विश्वासार्हता अधिक बळकट करण्यात ते यशस्वी झाले. बँकेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक यांचा त्यांच्यावरील विश्वास तसेच वेळोवेळी घेतलेले बँकेचे धोरणात्मक निर्णय यामुळे बँकेच्या प्रगतीत मोलाची भर पडली. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांचे बरोबरच सेवकाचे प्रश्नही सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
बँकेचे नुतन चेअरमन यांनी यावेळी सांगितले की, बँकेच्या संचालकानी जो माझ्यावर विश्वास दाखवुन चेअरमन पदाची जबाबदारी सोपविली आहे ती आम्ही सर्व संचालक मंडळ यशस्वीपणे पार पाडू व सध्याच्या स्पर्धेच्या काळात नवनवीन टेकनॉलॉजीचा वापर करून ग्राहक सेवा उत्तम देण्याचा प्रयत्न करण्यात येईल व बँकेच्या प्रगतीची यशस्वी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी झालेल्या सभेत बँकेचे व्हा. चेअरमन सौ. त्रिशला गंगवाल व सर्व संचालक कैलासचंद ठोळे, रविंद्र लोहाडे, कल्पेश शहा, सत्येन मुंदडा, रविंद्र ठोळे, दिपक पांडे, सुनिल बोरा, अनिल कंगले, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, भाऊसाहेब लोहकरे संचालीका प्रतिभा शिलेदार मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे हे उपस्थित होते. संचालक अतुल काले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले, नंतर सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *