टॉस ऍथलेट 2025 मध्ये के.जे.सोमैय्या महाविद्यालयातील प्रा.डॉ.वसुदेव साळुंके यांचे विशेष नैपुण्य…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील डॉ. वसुदेव साळुंके यांनी विद्याविहार मुंबई येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ‘टॉस ऍथलेट 2025’ मध्ये विशेष नैपुण्य मिळविल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रो.डॉ. विजय ठाणगे यांनी दिली आहे.
के.जे.सोमैया विद्यापीठ विद्याविहार,मुंबई च्या वतीने दरवर्षी टॉस ऍथलेट चे आयोजन करण्यात येत असते. या वर्षी दिनांक 23 व 24 जानेवारी 2025 रोजी झालेल्या या स्पर्धेत महाविद्यालयाच्या भूगोल विभागाचे प्राध्यापक डॉ.वसुदेव साळुंके यांनी लक्षवेधक कामगिरी केली या स्पर्धेमध्ये त्यांनी एकूण चार पदके प्राप्त केली असुन यामध्ये तीन सुवर्णपदक व एक कांस्य पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेमध्ये डॉ. वसुदेव साळुंके यांनी उत्तम कामगिरी करत १०० मीटर (14.5 सेकंद) व २०० मिटर (30सेकंद) व ४०० धावणे (1:09सेकंद) एवढ्या विक्रमी वेळामध्ये पूर्ण केले व त्यात त्यांनी सुवर्ण पदक प्राप्त केले.तसेच त्यांनी गोळा फेक या क्रीडा प्रकारात देखील कांस्य पदक मिळवले.
महाविद्यालयातील प्रा.डॉ.वसुदेव साळुंके मिळविलेल्या या नैपुण्याबद्दल को.ता.ए.सोसायटीचे विश्वस्त संदीपराव रोहमारे, प्र.प्राचार्य प्रो.डॉ.विजय ठाणगे यांनी महाविद्यालयात विशेष सत्कार केला.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

फोटो ओळ :- डॉ.वसुदेव साळुंके सुवर्णपदक स्वीकारताना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *