कोपरगाव शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावून नागरीकांच्या अडचणी सोडवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरात अनेक विकास कामे प्रलंबित असून त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने प्रलंबित असणारी विकास कामे मार्गी लावून नागरिकांना येत असलेल्या अडचणी सोडवाव्यात अशा आशयाचे निवेदन कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, मागील अनेक महिन्यांपासून लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण झालेलं नाही. त्याची दखल घेवून लवकरात लवकर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय अनावरण करण्याचे नियोजन करावे. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या साईड पट्ट्यांचे प्रलंबित काम पूर्ण करावे, विविध प्रभागांतील चिखलमय झालेल्या रस्त्यांवर मुरूम टाकण्यात यावा,मागील काही दिवसांपासून सतत पाऊस सुरु असून त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता आहे. रोगराई थांबविण्यासाठी शहरात कीटकनाशक धूर फवारणी करावी. डबक्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढत असून या डबक्यांमधले पाणी काढण्यात यावे व सर्वच गटारी वाहत्या कराव्या आदी मागण्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी शांतारामजी गोसावी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, फकीर कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र खैरनार, आकाश डागा, अंबादास वडांगळे, बाळासाहेब पवार, एकनाथ गंगूले, किरण आढांगळे, माणिक जाधव आदी उपस्थित होते.
चौकट – राज्याचे माजी उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार हे विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी कोपरगाव येथे आले असता लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्याचे नियोजित होते. परंतु ज्या व्यक्तींना अण्णाभाऊ साठेंच्या कार्य कर्तुत्वा विषयी देणे घेणे नाही त्यांना फक्त राजकारणाविषयी देणे घेणे आहे अशा लोकांना हाताशी धरून विरोधकांनी आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे होणारे शासकीय अनावरण आजवर थांबवलं आहे.त्यामुळे कोणीही येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या झाकलेल्या पुतळ्याचे आच्छादन काढत आहे. शासकीय अनावरण झालेलं नसतांना त्यांच्या पुतळ्याचे आच्छादन काढणे हा अण्णाभाऊ साठे यांचा अनादर असून अशा वृत्तीचा आम्ही निषेध करतो- सुनिल गंगुले

फोटो ओळ:- कोपरगाव शहरातील विविध प्रश्नांबाबत मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *