
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपल्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे तसेच जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यास शासनातर्फे बंदी करण्यात आली आहे व अत्यावश्यक कामानिमित्त प्रवास करण्यासाठी ई-पास काढणे बंधनकारक केले आहे.
● ई-पास काढण्यासाठी covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर जाऊन नविन फॉर्म भरण्याचा पर्याय निवडावा (Apply for new pass).
● या फॉर्ममध्ये आपले नाव, पत्ता, प्रवासाचे कारण, प्रवासाचे ठिकाण, प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या आदी माहिती प्रविष्ठ करावी.
● प्रवास करणाऱ्या सर्वांचा (ड्रायव्हरसह) कोरोना चाचणीचा रिपोर्ट (Rapid antigen / RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट) व सर्वांचे आधार कार्ड एकत्र पीडीएफ (PDF) फाईल बनवून अपलोड करावे.
● ज्या व्यक्तीच्या नावाने अर्ज करत आहे त्या व्यक्तीचा फोटो अपलोड करावा.
● टोकन नंबरवरून आपण आपल्या ई-पासच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेऊ शकता.
● आपल्या प्रवासाच्या कारणाची आवश्यकता तपासून व अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून २४ तासांमध्ये ई-पास मिळून जाईल.
- आपलाच
अनिरुद्ध काळे…
