मा.मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले; तसेच मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब व कोपरगाव नगरपरिषद टीम चे मनापासून आभार मानले:- विक्रांत झावरे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक २९ एप्रिल २०२१ रोजी मा. राजाभाऊ झावरे शिवसेना जिल्हाप्रमुख उत्तर नगर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत झावरे यांच्या हस्ते मा.मुख्याधिकारी साहेब, कोपरगाव नगरपरिषद, कोपरगाव यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले..
विक्रांत झावरे यांनी प्रथमतः मुख्याधिकारी प्रशांत सरोदे साहेब व कोपरगाव नगरपरिषद टीम चे मनापासून आभार मानले व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या, गेल्या वर्षभरापासून कोपरगाव शहराची कोरोना महामारी पासून बचाव करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहात त्याबद्दल पुनाच्य एकदा मनापासून आभार मानले.
आपण आमच्या मागण्या मान्य कराल अशी आशा बाळगतो,
१. सध्या कोपरगाव शहरात संचार बंदी व जनता कर्फू असताना सर्व रस्ते निर्मनुष्य आहे त्यामुळे आपण शहरातील सर्व रस्त्याची कामे उच्च दर्जाची करावी, शहरात सर्वच रस्त्याला धुळीची प्रमाण वाढले आहे त्यामुळे फुफुसाचे व श्वसनाचे आजार होत आहे तसेच रस्त्याला पडलेल्या खड्यामुळे मणक्याचे आजार होत आहे, त्यामुळे रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करावे.
२. कोपरगाव शहरातील मुख्य रस्ता धारणगाव रोड बस स्थानकाजवळील चालू असलेले गटारीचे काम जलद गतीने पूर्ण करावे, मुख्य रस्ता असल्याकारणाने ती वाहतूक गुरुद्वारा रोड ने होत आहे तर त्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, त्यामुळे ते काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
३. शहरात वातावरणाच्या बदलामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे, डासामुळे नागरिकांना डेंगू, मलेरिया सारख्या गंभीर आजाराला सामोरे जावा लागेल तसे होऊ नये, नागरिक कोरोना आजाराणे हतबल झाले आहे, त्यामुळे शहरात डासांची फवारणी लवकरात लवकर चालू करावी.
४. सध्या शहरात व सगळीकडे उन्हाळा सुरु झाला आहे, शहरात पाणीपुरवठा ७/८ दिवसआड आहे तर तो पाणीपुरवठा २/३ दिवसाआड करावा, हि विनंती.
५. कोपरगाव नगरपरिषदेचे सर्व ठेकेदारी कर्मचारी हे कोरोना महामारीत स्वतःच्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहे, त्यामुळे सर्व ठेकेदारी कर्मचार्याना ठेकेदार किवा नगरपरिषद मार्फत विमा संरक्षण द्यावे.
अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले, या वेळी विक्रांत झावरे यांच्या समवेत प्रणव वाणी, विशाल झावरे, भूषण वडांगळे, अभिषेक कोकाटे, रितेश राउत आदी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *