शिर्डी विधानसभेतील मतदान यंत्रे जुळवणी प्रक्रियेला सुरूवात…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- शिर्डी विधानसभा मतदारसंघातील २७१ मतदान केंद्रासाठीची मतदान यंत्रे तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली. मतदान यंत्रे तयार करण्याचे हे काम निवडणूक आयोगाच्या मागदर्शक सूचनानुसार अतिशय काटेकोरपणे करण्यात येत आहे.


यावेळी शिर्डी विधानसभा मतदारसंघात ८ उमेदवार निवडणूक लढत असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान यंत्राबरोबर एकच इलेक्ट्रॉनिक्स बॅलेट पेपर वापरावे लागणार आहेत. शिर्डी विधानसभा मतदारसंघात १ सहाय्यकारी मतदान केंद्रासह २७१ मतदान केंद्र आहेत. यासाठी मतदान यंत्रे जुळवणी करण्याचे काम राहाता तालुका प्रशासकीय भवन येथे सुरू झाले. ही प्रक्रीया दोन दिवस चालणार आहे. यासाठी २१ टेबलवर प्रत्येकी ६ अधिकारी/कर्मचारी असे एकूण १०६ अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे यांच्या देखरेखाली ही मतदान यंत्रे तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. यावेळी नायब तहसीलदार हेमंत पाटील, मनोज भोसेकर, बाळासाहेब मुळे, राहाता नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे आदी अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *