शिर्डी मतदारसंघातील उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी संपन्न…

Uncategorized

खर्च निरीक्षक देबाशिष बिस्वास यांची उपस्थिती…
कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- खर्च निरीक्षक देबशीष बिस्वास यांच्या उपस्थितीत शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी राहाता येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात येथे पार पडली.
या तपासणीस सर्व ८ उमेदवारांपैकी काही उमेदवार स्वत : व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी निरीक्षक‌स्वत: सर्व उमेदवारांच्या खर्चाच्या नोंदवह्यांची काटेकोरपणे तपासणी केली. प्रथम तपासणीनंतर उमेदवारांच्या खर्चाचे दैनंदिन नोंदवही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. दुसरी तपासणी १४ रोजी पार पडणार आहे. या तपासणीस सर्व उमेदवारांनी त्यांच्या खर्च नोंदवह्यांसह उपस्थित रहावे. असे आवाहन श्री.बिस्वास यांनी केले आहे.
या तपासणीला सहायक खर्च निरीक्षक मयांक जोशी, उपकोषागार अधिकारी तथा समन्वयक अधिकारी आर.एस.राहिंज, लेखाधिकारी ए.बी.कोल्हे, सुभाष मोरे, जे.डी. शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *