
कोपरगाव प्रतिनिधी:-
के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे ७५ वा भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चासनळी येथील आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा मानून आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे स्थानिक शालेय शिक्षण समितीचे सदस्य डॉ.विकास जामदार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, उज्वल भारत घडवण्यासाठी तरुणांनी जागृत होऊन व्यसनमुक्त व्हावे आणि देश हित साधावे असे असे त्यांनी सांगितले.
आपल्या प्रस्ताविकात प्राचार्य श्री. एन .जी. बारे सर यांनी सर्व उपस्थित विद्यार्थी, पालक व मान्यवरांचे स्वागत केले . अमृत महोत्सवी वर्षाचे महत्व अचूक शब्दात विद्यार्थ्यांना सांगितले.
आपल्या प्रमुख पाहुणे भाषणात माननीय .श्री. रामभाऊ गाढे यांनी सांगितले की ,के .बी. रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थी हे सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवताना दिसत आहेत तसेच आजचा तरुण हा उद्याचा भारत घडविणार आहे म्हणून तरुणांनी देश प्रेम व देशसेवा हे गुण अंगीकारावे असे उद्गार यावेळी आपल्या भाषणात त्यांनी काढले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये कुमारी गाढे अंजली, कुमारी सानप प्रीती, कुमारी पारखे गायत्री, कुमारी पेंढारी नेत्रा व कुमार वाघ गोकर्ण या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशभिमान व्यक्त केला.
भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा वकृत्व स्पर्धा व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी येथे व्यसनमुक्तीची. शपथ डॉ. मोरे यांनी दिली कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण समितीचे सदस्य विकास जामदार प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामभाऊ गाढे.मा. श्री. संजय प्रभाकर चांदगुडे मा. श्री. कोकाटे सर पालक, ग्रामस्थ उपस्थित होते
या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक ढेकळे. एस. पी. यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रणधीर .ए .बी .यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
