अध्यादेशानुसार १ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ७:०० ते ११:०० च्या दरम्यान सुरू राहतील:- डॉ.राजेंद्र भोसले जिल्हाधिकारी…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
जिल्हाधिकारी यांनी नुकताच काढलेला नव्याने अध्यादेश लागू करण्यात येत आहे. या अध्यादेशानुसार १ मे पर्यंत जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सकाळी ७:०० ते ११:०० च्या दरम्यान सुरू राहतील.

११ नंतर वेळेस सर्व दुकाने, कार्यालय, भाजीपाला बाजार बंद राहतील. 🟦हॉटेल, रेस्टॉरंटस, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलेवरी चालू राहील 🟦धार्मिक स्थळे पुर्णतः बंद राहतील 🟦आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील 🟦भाजीपाला / फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील. 🟦दारु दुकाने पूर्णतः बंद राहतील 🟦टैक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील. चार चाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवांकरिता वाहतुकीस चालू राहतील. 🟦 दोन चाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील. 🟦सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील 🟦कटींग सलून, स्पा, ब्यूटीपार्लर पुर्णतः बंद राहतील 🟦 शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील 🟦 स्टेडिअम, मैदाने पूर्णतः बंद राहतील 🟦 विवाह समारंभास बंदी राहील. 🟦 चहाची टपरी /दुकाने पूर्णतः बंद राहतील 🟦अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील 🟦सिनेमा हॉल, नाटयगृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंद राहतील सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रिडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील 🟦 सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील 🟦 सेतू ई-सेवा केंद्रे, आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील 🟦व्यायाम शाळा, स्विमींग पुल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग इव्हीनिंग वॉक पुर्णतः बंद राहील. बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *