

कोपरगाव प्रतिनिधी (पुणतांबे):- कार्तीक पोर्णीमा व कृत्तीका नक्षत्र पर्वकाळ साधुन सुमारे चाळीस हजार भाविकांनी आज कार्तीक स्वामींचे दर्शन घेतले. गोदावरी नदीला पाणी होते. त्यामुळे गंगास्नांचा लाभ दुरवरुन आलेल्या भाविकांनी घेतला. महीलांनी अहील्याबाई घाटावर त्रिपुराच्या वाती जाळल्या.


यावर्षी कृत्तीका नक्षत्राचा पर्वकाळ दोन दिवस होता. त्यामुळे गुरुवार शुक्रवार दोन दिवस मंदीर गर्दीने गजबजले होते. कार्तीक पोर्णीमा व कृत्तीका नक्षत्र पर्वकाळातच महीलांनी स्वामींचे दर्शन घ्यावे असा ऊल्लेख पुरानात असल्याने वर्षातुन एकदाच महीलांना स्वामींच्या दर्शनाचा योग असतो. त्यामुळे आज महीलांनी दर्शनासाठी रांगेत बा-या लावल्या होत्या.


जिल्हा परिषद माजी अध्यक्षा शालीनी विखे. भाजपा च्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे. प्रसिद्ध किर्तनकार ईंदोरीकर महाराज यांनी पुणतांब्यात येऊन कार्तीक स्वामींचे दर्शन घेतले. व कोरोना महामारीमुळे निर्माण झालेली अर्थिक समस्या दुर होऊन कोरोनाचे संकट टळन्याचे साकडे स्वामींना घातले.
सरपंच डाँ धनंजय धनवटे, ऊपसरपंच योगेश धाटकर, शरद गोर्हे, भोला ऊदावंत, नितीन भगत, अतुल कुलकर्णी, आदींनी भाविकांना दर्शन सुलभतेने घेता यावे यासाठी प्रयत्न केले. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप मंडलीक यांच्या देखरेखीखाली पोलीस बंदोबस्त चोख होता.
