
कोपरगाव प्रतिनीधी:-
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा विचार करता मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ आणि सुविधांची निर्माण होणारी कमतरता यात सामान्य नागरिक भरडला जातो आहे या पार्श्वभूमीवर कोपरगाव येथे दिनांक ११-०४-२०२१ रोजी
महसुलमंत्री नामदार श्री.बाळासाहेब थोरात साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकिस भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे उपस्थित होत्या..!!
सदर बैठकीत कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत असणारी तफावत,प्रत्यक्षात मृत्युदर आणि अहवाल यांची असंदिग्धता यावर नामदार बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत यापुढे दक्षता घेण्याच्या सूचना केल्या..!!
सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी पुढील सूचना व नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या या बैठकीत मांडल्या-
१)नागरीकांना वेळेवर बेड उपलब्ध होत नाहीत..!!
२)ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची अधिक गरज मतदारसंघात आहे..!!
३)टेस्टिंगची संख्या वाढवून होम आयसोलेशन सारखा घातक पर्याय हा नागरिकांना जीवघेणा ठरत आहे..!!
४)विलगीकरण कक्ष तात्काळ सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा..!!
५)रेमडिसिवीर या इंजेक्शनच्या उपलब्धतेच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे असून अत्यंत गंभीर प्रश्न निर्मान झाला आहे यावर कार्यवाही व्हावी..!!
६)चाचणी केल्यानंतर जे अहवाल नगर येथे तपासणीसाठी जातात त्याचा रिपोर्ट हा चार पाच दिवसांनी येतो तो पर्यंत रुग्णांच्या कुटूंबातील इतर सदस्यांना आणि संपर्कातील व्यक्तींना कोरोना संसर्गाची बाधा पोहचते त्यासाठी अहवाल तात्काळ त्याच दिवशी मिळावे यासाठी उपाययोजना आवश्यक आहे त्यामुळे कॉन्टॅक्ट स्प्रेडिंग थांबण्यास मदत होईल..!!
७)कोरोनाचा मोठा उद्रेक पाहता आणि पालकमंत्रीही सातत्याने उपलब्ध नसतात त्यामुळे नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनीच आता कोपरगाव मतदारसंघाचे पालकत्व घ्यावे अशी मागणी सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी केली..!!
८) जीव धोक्यात टाकून जनसेवा करणाऱ्या एस टी चालक,वाहक आणि कर्मचारी बांधवांचे तात्काळ कोरोना लसीकरण करण्यात यावे व कर्मचारी बांधवांचा आणि त्यांच्या कुटूंबाचा जीव धोक्यात जाईल अशी मुंबई येथे बेस्ट मध्ये सेवा देण्याची केलेली सक्ती तात्काळ थांबवावी अशीही मागणी केली आहे.!!
९) आरोग्य कर्मचाऱ्यांवर रुग्णसंख्या वाढीने ताण निर्माण झाला आहे त्यांच्या मदतीसाठी अतिरिक्त आरोग्य सेवकांच्या संख्येत वाढ करावी..!!
“या सह अन्य अनेक मागण्या स्नेहलताताई कोल्हे यांनी नामदार बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केलेल्या आहेत त्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही करू असे नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी सूतोवाच केले आहे..!!”

या आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब,खासदार सदाशिव लोखंडे,आमदार सुधीरजी तांबे,आमदार आशुतोष काळे,पोलीस उपअधिक्षक संजय सातव साहेब,प्रांताधिकारी गोविंद शिंदे साहेब,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते,ग्रामिण रुग्णालयात अधीक्षक कृष्णा फुलसुंदर,डॉ.सौ.वैशालीताई बडदे,नायब तहसीलदार मनीषाताई कुलकर्णी,शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम,भाजपा शहराध्यक्ष डी.आर.काले,नगराध्यक्ष विजय वहाडणे,उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे,गटनेते रवींद्र पाठक,माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल,माजी उपनगराध्यक्ष विजयराव वाजे,भाजपा किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष व माजी सभापती सुनिल देवकर,मंगेश पाटील,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे,युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश पाठक,संदीप देवकर,प्रमोद नरोडे,विरेन बोरावके,तुषार पोटे,कलविंदरसिंह डडीयाल,दिपक जपे,जयेश बडवे,चंदन बागले,डॉ.योगेश कोठारी,अशोक कोठारी,स्वच्छतादूत सुशांत घोडके,अनिल गायकवाड,संतोष गंगवाल आदींसह सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी,पदाधिकारी,आजी माजी नगरसेवक,सामाजिक कार्यकर्ते,सर्व पत्रकार बांधव,अधिकारी,कर्मचारी आदी. उपस्थित होते..!!
