तिर्थंकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या विदयमाने आरोग्य निदान शिबिराचे आयोजन..!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव शहरांतील तिर्थंकर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या विदयमाने डॉ.अमोल अजमेरे व डॉ.रविंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील शिक्षकांसाठी आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालय परीवारातील १०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रक्त,तपासणी,इ.सी.जी,रक्तदाब,आदी रोगांचे निदान करुन त्यावर उपचार करण्यात येणार आहेत.

प्रारंभी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव स्व.जयकुमारजी अजमेरे यांच्या प्रतिमेचे पुजन डॉ.रविंद्र गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. डॉ.अमोल अजमेरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.या वेळी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.दीलीप अजमेरे यांच्या हस्ते डॉ.रविंद्र गायकवाड यांचा तर डॉ. अमोल अजमेरे यांचा तुपसैंदर डी.व्ही यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. स्व.जयकुमारजी अजमेरे यांच्या प्रतिमेचे पुजन डॉ.रविंद्र गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्ही यांनी आभार मानले. विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. या कार्यक्रमला श्री.गो.विदयालयांचे उपमुख्याध्यापक आर.ई.पाटील पर्यंवेक्षक आर.बी.गायकवाड डी.व्ही.तुपसैंदर,एन.के.बडजाते,जाधव ई.एल,शिरसाळे एस.एन,गवळे वाय.के,गोरे एस.डी,आदी शिक्षक,शिक्षिका सोशल डीसटन्स पाळुन उपस्थित होते.हे आरोग्य शिबिर शनिवार दिनांक १७ जुलै पर्यत सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *