महात्मा जोतीबा फुले यांच्या कार्यामुळेच समाजात समता : श्री.मुकुंद मामा काळे…..

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनीधी:-
विद्येविना मती गेली | मतीविना नीति गेली |
नीतीविना गती गेली | गतीविना वित्त गेले |
वित्ताविना शुद्र खचले |
इतके अनर्थ एका अविद्येने केले!!
~ महात्मा श्री जोतीराव फुले..।
अशिक्षित दुर्बल वर्गांना सबळ करण्यासाठी, त्यांच्या सामाजिक उन्नयनासाठी त्यांना शिक्षणाची वाट उघडी करून देणे, हेच ज्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय मानले ते सत्यशोधक समाजाचे संस्थापक व थोर समाज सेवक,

  महात्मा श्री जोतीराव फुले

यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..।।
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले या थोर समाज सुधारक दाम्पत्याने स्री शिक्षणाचा उद्धार केला,गोर गरिबांच्या झोपडी पर्यंत शिक्षण मिळायला हवे आणि महिला सुशिक्षित व्हायला हव्या हा ध्यास उभयतांनी घेतला आणि स्री शिक्षणाचा पाया रचला म्हणुन आज आपण सर्वत्र एवढी प्रगती आणि समता बघतो आहे,असे प्रतिपादन मुकुंद मामा काळे यांनी केले.
बहुजन समाजात स्वाभिमानाची ठिनगी पेटवली आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात होणारे अन्याय अत्याचार दूर व्हावे म्हणुन नेहमी संघर्ष केला,सत्यशोधक समाजाची चळवळ रुजवली म्हणुन परंपरागत चाली रीती जाती पातीच्या पुढे जावुन समाज संस्कारित झाला हे दिव्य काम केले.
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन श्री.किशोर काळे व सौ.शोभाताई काळे यांनी केले.अहमदनगर जिल्हा श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.मुकुंद मामा काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.छायाताई मुकुंद काळे व श्री संत सावता माळी युवक संघाचे कोपरगाव तालुका सचिव श्री.योगेश ससाणे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.पल्लविताई योगेश ससाणे यांनी कोरोनाच्या पार्शभूमीवर घरीच थांबुन जयंती साजरी केली.सर्वानी घरीच थांबुन महापुरुषांच्या चरणी लीन रहावे व त्यांचे विचार आमलात आणावे असे आवाहन केले,तसेच कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशाचे पालन करा,सामाजिक अंतर ठेवा,मास्कचा वापर करा,सॅनिटायझरचा वापर करा,बाहेरून आल्यानंतर हात व पाय स्वच्छ धुवा,प्रशासनाला सहकार्य करा,आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आणि घरीच महात्मा फुलेंच्या पुस्तकांचे वाचन करावे असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ संस्थापक अध्यक्ष श्री.सचिनभाऊ गुलदगड,कोपरगाव महात्मा फुले मंडल अध्यक्ष श्री प्रदीपजी नवले कोपरगाव नगरसेवक श्री वैभवभाऊ गिरमे,कोपरगाव तालुकाध्यक्ष श्री.अशोकजी माळवदे,उपाध्यक्ष श्री.संतोषजी रांधव कार्यअध्यक्ष डाॅ.मनोज भुजबळ,संपर्क प्रमुख श्री.संदीपजी ढोखे,कोपरगाव शहरध्यक्ष श्री.शेखरजी बोरावके,उपाध्यक्ष श्री.मनोजजी चोपडे,श्री.अनंत वाकचौरे,श्री.देवेश माळवदे,श्री.सुनिल मंडलिक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *