संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात कर्णबधिरांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
संगमनेर प्रतिनिधी :-
दिव्यांगांचे आधारस्तंभ आदरणीय डॉ. सुधीर तांबे साहेब ( माजी विधान परिषद सदस्य ) यांच्या वाढदिवसानिमित्त संग्राम निवासी मूकबधिर विद्यालयात कर्णबधिरांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी नाशिक, अहमदनगर , शिर्डी, बाभळेश्वर, संगमनेर , येवला असे राज्यातून आठ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन संग्राम संस्थेचे सेक्रेटरी डॉ, नामदेव गुंजाळ व उपाध्यक्ष सूर्यकांत शिंदे यांनी केले. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक माननीय आमदार डॉ. सुधीर तांबे साहेब , द्वितीय पारितोषिक माननीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब तर तृतीय पारितोषिक रणजित देशमुख साहेब यांनी दिले . मॅन ऑफ द मॅच श्री. सुनील कवडे सर मुख्याध्यापक संग्राम निवासी मुकबधिर विद्यालय व मॅन ऑफ द सिरीज श्री.संजय मासाळ सर कलाशिक्षक संग्राम निवासी मुकबधिर विद्यालय यांनी देले.


राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये नगर संघाने प्रथम क्रमांक पटकाविला, संगमनेर संघाने द्वितीय क्रमांक तर नाशिक संघाने तृतीय क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण लायन्स क्लबचे देविदास गोरे सर, संग्राम निवासी मुकबधिर विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक निळकंठ थोरात सर , वाय. डी. देशमुख सर, माजी वस्तीग्रह अधीक्षक सुरेश म्हाळस सर यांच्या हस्ते करण्यात आले. पंचांची भूमिका विशेष शिक्षक श्री. डी.एस. देशमुख सर, एस.आर. रागीर सर, कला शिक्षक एस.एस. मासाळ सर, व ऋषिकेश दिघे यांनी भूमिका पारपाडली, धावफलकाची जबाबदारी अमजद पठाण व एस.डी गुंजाळ सर यांनी पारपाडली. कार्य्रामाचे समालोचन डॉ.देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाचे विशेष शिक्षक भाऊसाहेब नरोडे सर यांनी बजावली. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संग्राम निवासी मुकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनिल कवडे सर, डॉ.देवेंद्र ओहरा मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चांगदेव खेमनर सर , शिक्षक व शिक्षकेतर कर्माचार वृंद व माझी दिव्यांग विद्यार्थी संघटना यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *