श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील कोपरगाव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात शनिवारी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक मंचच्या अध्यक्ष सुधाताई ठोळे होत्या.


याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त तथा प्रसिद्ध उद्योगपती कैलासशेठ ठोळे, दिलीपशेठ अजमेरे, संजयशेठ भन्साळी, दत्तात्रय कंगले, विजय बंब, योगतज्ज्ञ उत्तमभाई शहा, सुनील कंगले, राजाभाऊ शिंगी, अनिल कंगले, श्रीमती गुजराथी, डॉ. विलास आचारी, सचिन अजमेरे, संदीप अजमेरे, जगन्नाथ थोरे, श्रीमती रोहोम, मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, दिलीप तुपसुंदर यांच्यासह एस. जी. विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यासाठी विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी श्रीकृष्ण आणि गोपिकांच्या आकर्षक वेशभूषेत अनेकांचे लक्ष वेधून घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *