कोपरगाव प्रतिनीधी:-
कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे कोपरगाव शहराच्या लगत अनेक नवीन उपनगरांची निर्मिती झाली आहे. या उपनगरातील नागरिकांच्या रस्ते, पाणी,आरोग्य व स्वच्छता आदी बाबत अनेक समस्या असून या समस्यांकडे मागील काही वर्षात दुर्लक्ष झाल्यामुळे हे नागरिक आजही सोयी सुविधांपासून वंचित आहेत. याची कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन प्रभाग क्रमांक २ (जुना प्रभाग क्रमांक १) बरोबरच शहराची हद्दवाढ झालेल्या भागाच्या समस्या तातडीने सोडवून विकासाचे प्रश्न मार्गी लावा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत.
कोपरगाव शहरातील प्रभाग २ (जुना प्रभाग क्रमांक १) समतानगर व परिसरातील नागरिकांच्या विकासाच्या समस्या “नामदार आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत ना. आशुतोष काळे यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून जाणून घेतल्या. त्यावेळी नागरिकांनी उपस्थित केलेल्या विकासाच्या अनेक समस्यांचा आढावा घेऊन ना.आशुतोष काळे यांनी पालिका प्रशासनाला सूचना दिल्या. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे शहरातील नागरिकांना रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता या सोयीसुविधा मिळतात त्या सोयी सुविधा हद्दवाढ झालेल्या उपनगरातील नागरिकांना देखील मिळाल्या पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. यामागे विकास कामांमध्ये झालेली ढिलाई या पुढे करू नका. नागरिक पालिकेला कर भरतात त्या करापोटी त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणे पालिकेचे कर्तव्यच नाही तर जबाबदारी देखील आहे. त्यामुळे यापुढील काळात शहराच्या लगत हद्दवाढ झालेल्या सर्वच भागातील विकासाची कामे शिल्लक राहता कामा नये. कोपरगाव शहर व उपनगरांच्या विकासासाठी निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे ती जबाबदारी मी शंभर टक्के पार पाडणार तुम्ही शंभर टक्के विकासाचे प्रश्न सोडविण्याचे मनावर घ्या. नागरिकांना सोयीसुविधा मिळतील व नागरिक विकासाच्या बाबतीत समाधानी राहतील याची काळजी घ्या. त्यादृष्टीने प्रयत्न करून हद्दवाढ झालेल्या या भागातील नागरिकांचे समस्या गांभीर्याने घेऊन त्या तातडीने कशा मार्गी लावता येतील यासाठी प्रयत्न करा. अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करा अशा सूचना ना.आशुतोष काळे यांनी पालिका प्रशासनाला यावेळी दिल्या. त्यामुळे प्रभाग क्रमांक १ समतानगर व परिसरातील नागरिकांनी ना. आशुतोष काळेंचे आभार मानले आहे.
यावेळी यावेळी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नायब तहसीलदार श्रीमती गोरे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, वीज वितरण कंपनी अभियंता यद्नेश शेलार, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसुंदर, आरोग्य अधिकारी डॉ. गायत्री कांडेकर, शिक्षण प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पठारे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ. प्रतिभात शिलेदार, रमेश गवळी, दिनकर खरे, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, राहुल देवळालीकर, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, प्रफुल्ल शिंगाडे, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले, आकाश डागा, एकनाथ गंगूले, इम्तियाज अत्तार, मनोज कडू, राजेंद्र आभाळे, मनोज नरोडे, बाळासाहेब सोनटक्के, नारायण लांडगे, राजेंद्र जोशी, मुकुंद इंगळे, प्रसाद उदावंत, संतोष शेजवळ, दिनेश पवार, शैलेश साबळे, किशोर डोखे, मधुकर पवार, किरण बागुल, राजेंद्र खैरनार, विजय शिंदे, चांदभाई पठान, किरण बागूल, दिनकर खरे, अक्षय पवार, विलास पाटोळे, नितीन शेलार, असलम शेख, बाळासाहेब दहे, मयूर पारधी, चेतन आगळे, उमेश साबळे, मदन हिंगे, अजीम पठाण, जीवन बोर्डे, वैभव दळवी, मायादेवी खरे, रेखा जगताप, पूनम पाटोळे, मीना साळवे, चंद्रभागा हिंगे, रेखा पवार आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.

फोटो ओळ:- ‘नामदार तुमच्या दारी’ या उपक्रमा अंतर्गत कोपरगावात नागरिकांच्या समस्या जाणून घेतांना ना.आशुतोष काळे.
