आर जे एस कॉलेज मध्ये फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात साजरा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- आर जे एस कॉलेज फार्मसी कोकमठाण कोपरगाव येथे संस्थेचे अध्यक्ष चांगदेव कातकडे यांच्या अध्यक्षतेखाली फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फार्मसी कॉलेज, कोकमठाण येथे दिनांक २५/०९/२०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश वाणी, अविनाश जाधव, जितेंद्र गंगावळ, शामसुंदर डागा, नितीनजी दवंगे, प्रविणजी कदम, ओमजी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डागा, प्रविणजी गवळी रुपालीताई पाटील, सचिन आरुटकर, विजय जगताप, अनिल अहेरे, प्रशांत बोरावखे,रुतुल जाधव, दिगंबर गुरसाळ, सुरेश गुंड, दिपक. कोळपे, आरजेएस फाऊंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे, सचिव प्रसाद कातकाडे, कडू सर, प्राचार्य डॉ.नितीन पी जैन यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी गणेश वाणी सर अध्यक्ष , तालुका कोपरगांव , उपाध्यक्ष अहमदनगर ,केमिस्ट अससोसिएशन कार्यरत असून यांनी विद्यार्थ्यांना मालाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट चे महत्व समजावून सांगितले आणि त्यांच्या सोबत असणारे कर्मचारी त्यांनी हि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आर जे एस कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ .नितीन जैन सर यांनीही नुकतेच प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेतलेल्या बी व डी . फार्मासिच्या विद्यार्थ्यांना नवीन वाटचालीस शुभेच्छा देऊन मोलाचे मार्गदर्शन केले व एस जे एस हॉस्पिटल मध्ये नवीन सुरु झालेल्या कॅन्सर सेन्टर बद्दल माहिती दिली . तसेच फार्मा वीक मध्ये भाग घेतलेल्या विजेते विद्यार्थ्यांना अथीतींच्या हस्ते पारितोषित वितरण करण्यात आले. त्यानंतर अदिती शेवटे हिने सूत्रसंचालन केले तर प्राचार्य डॉ नितीन जैन सर यांनी आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *