सण उत्सव सभा समारंभ कुठेही गर्दि करणे टाळा:- नगराध्यक्ष विजय वहाडणे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोरोना वेगाने वाढतोय
आता तरी जबाबदारीने वागा
मास्कसॅनिटायझर वापरा नाही तर
हॉस्पिटलमध्येही मिळणार नाही जागा

सण उत्सव सभा समारंभ
कुठेही गर्दि करणे टाळा
शासनाने दिलेल्या सुचना
काटेकोरपणेच पाळा

संचारबंदी पुकारली तर
उघडूच नका दुकान-गाळा
संचारबंदी लावावी लागणे
सर्वांसाठीच दिवस काळा

अत्यंत गरज असेल तरच
आपण घराबाहेर पडावे
अन्यथा कोरोना झाल्यावर
शासनाच्या नांवाने का रडावे

वारंवार सुचना देऊनही
मास्कचा होत नाही वापर
काहींजणांना एकच जमते
यंत्रणेवरच फोडायचे खापर

दंड अन दंडुक्यालाही
जुमानत नाहीत काहीजण
कुत्र्याचे शेपूट वाकडेच
एकदमच रास्त आहे म्हण

परिवारासोबत आनंदात
घालवावेत निवांत क्षण
गलथानपणा कराल तर
समीप येईलच अंतिमक्षण

सुरक्षित अंतर ठेवायचे तर
नकोत बाजार यात्रा जत्रा
मास्क सॅनिटायझर वापरा
अन्यथा अकालीच अमरधाम यात्रा

…विजय वहाडणे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *