कोपरगाव दुचाकी चोराला अटक; कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई:- पोलिस निरीक्षक वासुदेव देसले….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यात व शहरात काही भागातून गेल्या काही दिवसापासून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढलेल्या दिसत असून त्याला आला घालण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी कंबर खचलेली दिसत आहे.

दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमाराच्या दरम्यान आयशा कॉलनी(कोपरगाव)येथील रहिवासी मजहर मेहबूब अत्तार यांच्या मालकीची काळे रंगाची होंडा कंपनीची शाईन दुचाकी क्र.MH–17 CJ-१३२९ हि घराबाहेरून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.त्याचा तपास पोहेका डी आर तिकोणे यांच्याकडे सोपविण्यात आला असून सदर गुन्हाचा तपास करताना मा.पोलीस अधीक्षक मनोज पाटील ,अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सताव, कोपरगाव पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेका तिकोने ,पोका शेवाळे ,पोका शिंदे यांनी गुप्त बातमीदारामार्फतीने माहिती मिळवली कि आयशा कॉलनी येथील मोटारसायकल चोरणारा इसम नामे अर्शद इलियाज बागवान (वय १९) हा चमडा बाजारात येणार असल्याचे कळताच पाळत ठेऊन असलेल्या पोलिसांना पाहून त्यांनी पळ ठोकला असता मोठ्या शिताफीने त्याला पकडण्यात कोपरगाव शहर पोलीसान यश आले.त्याला विचार पूस करण्यात आल्या नंतर मजहर मेहबूब अत्तार याचे मालकीची काळे रंगाची होंडा कंपनीची शाईन दुचाकी क्र.MH–17 CJ-१३२९ हि दुचाकी चोरल्याची कबुली दिल्या नंतर त्याच्या कडील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.सदरची कार्यवाही हि मा.पोलीस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे ,उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सताव, कोपरगाव पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोहेका तिकोने ,पोका शेवाळे पोका शिंदे यांनी केली आहे.पोलिसांच्या या धडक कारवाई मुळे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *