मॄत्युपुर्वीच मरू नका:- भरत मोरे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
जीवनाचा धाडसी प्रवास करा..
मॄत्युपुर्वीच मरू नका…
मॄत्यु तु फक्त एकच शब्द..
जो कधी संपतो अन कधी सुरू होतो..
अन कधी मातीमोल करतो …
हे कळतचं नाही…
मॄत्यु तु एकच जबाबदार माऊली..
जी कधी ना सोडणार या प्राणाची सावली..
कळलीच नाही जन्म घेताना किंमत तुझी..
नाहीतर हि प्राणज्योत तुला बिथरलीच नसती…
अंधारातल्या स्मशानातही उजेड तुझ्या बिदाईला..
सांग रे मॄत्यु तु एका शब्दातच कसा..
झाकोळल्या अपेक्षा,.. संपल्या होत्या ईच्छा…
मॄत्यु तुझ्या येण्यानं ठणठणीत झालो आता बरा…
कोरोना काय अन कोणाची करूना काय..
मॄत्यु तु आता पाहुणाचं होवून जाय..
विश्व साचीती ईवल्याश्या नयनात..
मॄत्यु तु येताच भगवंत दिसती
कणाकणात..
मॄत्यु तु असा कसा…
रूसुन बसतो एकाच शब्दात असा…
तु चेला आहे ना यमाचा…
आयुष्य जगतो मी शरीराचा घामाचा..
जे भयाच्या ओझाखाली मॄत्युखाली मरत नाही..
तेच त्याखाली दडलेल्या आनंदाची..
जाणीव जगाला करून देई…
धाडसीपणचं देई मॄत्युला आलिंगण..
भित्रेपणा देईल मॄत्युआधीच मरण…

भरत मोरे.
९५५२२२५५२८

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *