
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव शहरातील नागरिकांचे विकासाचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी शहरातील मतदारांनी कोल्हे गटाला कोपरगाव नगरपरिषदेत बहुमत दिले होते. मात्र मागील चार वर्षापासून सातत्याने विकासकामात राजकारण करून होणारी विकास कामे सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी होऊच दिले नाही.मंगळवार (दि.१२) रोजी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांच्या निविदा नामंजूर करून त्यांनी कोपरगाव शहरातील जनतेवर अन्याय केला आहे. त्या अन्यायाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस, मनसे आदी मित्र पक्षांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एक दिवसाचे लाक्षणिक निषेध आंदोलन करण्यात आले. लाक्षणिक निषेध आंदोलना सबंधी माहिती देतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे स्थायी समिती सदस्य नगरसेवक मंदार पहाडे यांनी सांगितले की, मंगळवार (दि.१२) रोजी कोपरगाव नगरपरिषदेमध्ये स्थायी समितीची सभा पार पडली. या स्थायी समितीच्या सभेत कोपरगाव शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कामाबरोबर शहरातील नागरिकांना दैनंदिन उपयोगात येणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांच्या निविदा मंजुरीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. मात्र सभागृहात एक बोलायचे व सभागृहाच्या बाहेर एक बोलणाऱ्या सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी या सर्व निविदा नामंजूर करण्यात धन्यता मानून कोपरगाव शहराचा होणारा विकास थांबविला आहे. आमचे मार्गदर्शक आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार विकासात राजकारण करायचे नाही या विचारांनुसार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आजपर्यंत सर्वोतोपरी सहकार्य केले आहे व यापुढे देखील करणार आहे. मात्र ज्या जनतेने आपल्याला विकासासाठी बहुमत दिले त्या बहुमताच्या जोरावर जनतेच्या अपेक्षांची राखरांगोळी करून विकासाच्या बाबतीत राजकारण करण्याची कोल्हे गटाच्या नगरसेवकांनी आपली परंपरा कायम ठेवली आहे. सत्ताधारी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना विकास कामांबाबत किती खोटा कळवला आहे हे नागरिकांसमोर येवून यांच्या चेहऱ्यावरचे विकासाचे खोटे चेहरे उघड करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे आंदोलन केले आहे. ज्यांनी शहरातील जवळपास चार कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदांना बहुमताच्या जोरावर स्थगिती दिली त्यांना शहरातील जनता कधीही माफ करणार नाही असे नगरसेवक मंदार पहाडे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनिल गंगूले, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ. प्रतिभाताई शिलेदार, सौ.माधवीताई वाकचौरे, सौ.सपना मोरे, सौ.वर्षा शिंगाडे, मेहमूद सय्यद, संतोष चवंडके, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनील शिलेदार, सलीम पठाण, शिवसेना शहरप्रमुख कलविंदर डडीयाल, भरत मोरे, असलम शेख, इरफान पठाण, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्ष शीतलताई देशमुख, शहराध्यक्ष रेखाताई जगताप, सुनील साळुंके, तुषार पोटे, युवक अध्यक्ष अक्षय हंगरे, कृष्णा आढाव, दिनार कुदळे, सुनील बोरा, प्रशांत वाबळे, प्रा.अंबादास वडांगळे, डॉ.तुषार गलांडे, राजूभाई पठाण, मनसेचे सुनील फंड, अनिल गायकवाड,राजेंद्र वाकचौरे, फकीरमामू कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, रावसाहेब साठे, सौ. मायादेवी खरे, राहुल देवळालीकर, वाल्मिक लहिरे, चंद्रशेखर म्हस्के, राजेंद्र खैरनार, अशोक आव्हाटे, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के, संदीप देवळालीकर, एकनाथ गंगूले, गणेश लकारे, राजेंद्र आभाळे, विजय चवंडके, राजेंद्र जोशी, विशाल निकम, दिनेश संत, गोरक्षनाथ कानडे, बेबीआपा पठाण, छायाताई फरताळे, पुष्पाताई शिंदे, शहनाज सय्यद, तेजस साबळे, ऋषिकेश खैरनार, कार्तिक सरदार, शुभम लासुरे, वैभव विदुर, आनंद जगताप, आकाश डागा, अशोक लांडगे, ऋतुराज काळे, फिरोज शेख, कासीम अत्तार, अशपाक सय्यद, संतोष शेलार, लक्ष्मण आमले, प्रसाद उदावंत, अझरुद्दीन शेख, फिरोज पठाण, गिरीश अकोलकर, कृष्णा कडलग, अक्षय आंग्रे, ऋषी पगारे, दादा आवारे, अश्पाक सय्यद, आशु गुरादे, फिरोज सय्यद, प्रतीक रुईकर, कुलदीपकुमार लवांडे, संतोष बारसे, संतोष दळवी, सुनील साळुंके आदी उपस्थित होते.
फोटो ओळ-कोल्हे गटाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी विकासकामांच्या निविदा नामंजूर केल्याच्या निषेधार्थ एक दिवसाचे लाक्षणिक निषेध आंदोलनात सहभागी झालेले राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना,राष्ट्रीय कॉंग्रेस, मनसे आदी मित्र पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
