मा.राज्यपाल श्री. रमेश बैस यांचा अहमदनगर जिल्हा दौरा…

Uncategorized

मा.राज्यपाल श्री. रमेश बैस यांचा अहमदनगर जिल्हा दौरा…

कोपरगाव प्रतिनिधी
(अहमदनगर):- महाराष्ट्र राज्याचे मा. राज्यपाल श्री. रमेश बैस यांचा अहमदनगर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
शुक्रवार दिनांक 7 जुलै, 2023 रोजी सकाळी 11 वाजता मा. राष्ट्रपती महोदय यांचे समवेत विमानाने शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता शिर्डी विमानतळ, काकडी ता. कोपरगाव येथे आगमन. दुपारी 12.10 वाजता मा. राष्ट्रपती महोदया यांचे समवेत श्री साईबाबा मंदिर देवस्थानकडे प्रयाण. दुपारी 12.25 वाजता मा. राष्ट्रपती महोदया यांचे समवेत श्री साईबाबा मंदिर येथे आगमन. दुपारी 12.25 ते 12.35 राखीव. दुपारी 12.35 ते 1.20 वाजता श्री साईबाबा मंदिर येथे आरती व दर्शनास उपस्थिती. दुपारी 1.20 ते 1.30 वाजता राखीव. दुपारी 1.30 ते 2.30 वाजता प्रसाद सेवनम. दुपारी 2.35 वाजता मा. राष्ट्रपती महोदया यांचे समवेत श्री साईबाबा मंदिर येथुन शिर्डी विमानतळाकडे प्रयाण. दुपारी 2.50 वाजता शिर्डी विमानतळ, काकडी ता. कोपरगाव येथे आगमन. मा. राष्ट्रपती महोदया यांचे विमानतळावरील निरोप समारंभास उपस्थिती. दुपारी 3 वाजता शिर्डी विमानतळ येथुन विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *