
आत्मा मालिक ध्यान योग मिशन.
कोपरगाव प्रतिनिधी:-
आत्मा मालिक गुरूपौर्णिमा महोत्सव सदगुरू आत्मा मालिक माऊलींच्या दिव्य सानिध्यात व सकल
आत्मा मालिक संतपिठाच्या उपस्थित आत्मानंदात संपन्न झाला.
दिनांक २९ जून आषाढी एकादशीच्या पावन पर्वावरतीच या आत्मा मालिक गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमाची सुरवात पहाटे ४ वाजता आत्मरूपमंदिरातील पादूका पूजनाने झाली, याच दिवशी सकाळी ०८ वाजता सर्व संत, संतमाता, साधक, साधिका व भाविक भक्त परिवाराच्या समवेत आत्मरूप मंदिरातून पालखी नगर प्रदक्षिणा सोहळया साठी भक्तीमय वातावरणात निघाली या पालखी सोहळयात आत्मा मालिक गुरुकुलाच्या विद्यार्थ्याचे टाळ मृदूंग पथक व बॅण्ड पथक सहभागी झाले. सकाळी १० वाजता आदरणीय संत परमानंद महाराज लिखीत ‘अवतारलीला आत्मस्वरूपाची’ या ग्रंथाचे प्रकाशन परमपूज्य सदगुरू आत्मा मालिक माऊलींच्या पावन करकमलाद्ववारे झाले असून सदर ग्रंथ भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आला. आषाढी एकादशी पासून पाच दिवस हया ग्रंथाचे पारायण श्री नरोडे महाराज, श्री हरिअनंत महाराज, श्री रोहम महाराज, श्री दिवटे महाराज या यजमानांद्वारे करण्यात आले . हया ग्रंथपारायणची विधीवत सांगता गुरूपौर्णिमेच्या दिवशी करण्यात आली. दिनांक १ जुलै २०२३ रोजी सकाळी १० ते १२ या वेळे मध्ये ३०० भाविकांच्या अनुष्ठान व्रताच्या विधीची सांगता आदरणीय संत शांती माई यांचे आशिर्वादाने संपन्न झाली.
२ जुलै २०२३ चौदस पौर्णिमेच्या दिवशी आत्मयोग गुरूकुल मधील विद्यार्थ्याच्या धर्मसंस्काराचा विधी परमपूज्य सदगुरू माऊलींच्या करकमलाद्वारे विधीवतपणे पार पडला. दिनांक ३ जुलै ब्राम्हमुहुर्तावरती या आत्मयोग गुरूकुलातील बाल ब्रम्हचारी व संत परमानंद महाराज यांचे हस्ते सदगुरू पूजन करण्यात आले.
या गुरूपौर्णिमेच्या ऊत्सवा निमीत्ताने देश विदेशातील लाखो आत्मप्रेमी भाविकांनी आत्मा मालिक माऊलींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली. या तिन दिवसीय सोहळयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आलेल्या लाखो भाविकांसाठी भोजन, निवासासह सर्व सुविधा आत्मा मालिक ध्यान योग मिशन च्या वतीने मोफत पुरविण्यात आल्या होत्या ३ जुलै च्या ब्राम्हमुहुर्तावरती सदगुरू माऊलीचे
करकमलद्वारे ‘आत्मयोग’ हा ग्रंथाचे प्रकाशन करून सर्वाना अभ्यासासाठी अर्पित करण्यात आला
यावेळी सत्संगामध्ये उपस्थित आत्मप्रेमी भा भाविकांना उपदेश करताना संत परमानंद महाराज म्हणाले व्यास मुनघ पासुन सांगितले आहे की, सदगुरू पौर्णिमा प्रत्येक साधकाने आपल्या सदगुरू स्थानावर येवून त्यांच्या चरणी आपल तन, मन, धन अर्पित करून कृतज्ञता व्यक्त करायची असते. आपण दिलेल दान काही काळात संपुष्टात येत. मात्र सर्वश्रेष्ठ सर्वोच्च दात्याने दिलेल दान हे शाश्वत असत. त्यांच्या जवळ आलेल्या प्रत्येकांच्या झोळीत जे दान टाकतो ते काही नाश पावत नाही हेच शाश्वत दान निगुर्ण निराकार ब्रम्हाच अर्थात सदगुरू माऊलींचे कोकमठाणच्या क्षितिजावर आत्मप्राप्तीची जन्मोजन्मीची वर्णी लागणार आहे. गुरुमाऊलींनी आजीवन विश्वकार्याची सेवा केल्याने माऊलींच्या करकमलाद्वारे प्रकाशीत केलेला ‘आत्मयोग ‘हा ग्रंथ अखिल विश्वात्मक कार्यसाठी अर्पित केला आहे. आजपर्यंत परमपूज्य माऊलींकडून नामदीक्षेद्वारे मंत्र देण्यात आला तसेच साधकांना ध्यान आभ्यासाचे तंत्र देखील दिलेल आहे आणि आता विश्वात्मक परिवारासठी माऊलींनी हा ग्रंथ प्रदर्शीत करून दिल्याने गुरूपौर्णिमच्या महापर्वाचा हा त्रिवेणी महाप्रसाद झाला आहे. गेली आठ दशकाहून माऊली या पुण्यभूमीत व्रतस्थ आहेत… त्यांनी अनेक संताना भक्ताना साधनाव्रत देवून ध्यान अभ्यास करून घेतला आहे. त्यांचे हे कार्य एका शतका पुरते नसून अनंत काळापर्यंत चालणारे आहे. आत्मप्राप्तीची परंपरा पुढे चालू रहावी म्हणून गुरु माऊलींनी ‘आत्मयोग’ या ग्रंथाची निर्मिती संत परमानंद महाराज यांचे कडुन करून घेतली. यापुर्वी लिखीत ग्रंथ नव्हता आपल्याकडे सदगुरू माऊली म्हणजेच चालता बोलता पंचमवेद होता. सदगुरू माऊलींच उभ आयुष्य म्हणजेच यातील एक-एक ओवी आहे. आपण सगळीकडे जरी हरलो तरी या हरिने आपल्याला स्विकारले आहे, अर्थात असे होण्यामध्ये सुध्दा त्याची हरिगिरी म्हणजेच लीला लपलेली होती. कारण आपल्या आत्म्याचे आरोहन त्यात दडलेल होत आणि ते शक्य झाल या हरिमुळे त्यांनी आपल्याला स्विकारल म्हणूनच आत्मज्ञानाचा शाश्वत प्रसाद कलियुगात मिळाला असे म्हणत आत्मा मालिक ध्यान योग मिशनचे कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी भाविकांना उपदेश केला. या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री प्रकाशभाई मेहता साहेब खेड तालुक्याचे आमदार श्री दिलीपरावजी मोहिते पाटील साहेब, श्री दिलीपरावकाका बनकर तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, शासकिय पदाधिकारी यांनी देखील परमपूज्य माऊलींच्या दरबारी उपस्थिती लावून परमपूज्य माऊलींचे दर्शन व आशिर्वाद घेतला.
यावेळी आत्मा मालिका ध्यान योग चे अध्यक्ष संत निजानंद महाराज, कार्याध्यक्ष संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज, संत चंद्रानंद महाराज, संत राजनंद महाराज, संत सधनानंद महाराज, संत सर्वेशानंद महाराज, संत प्रेमानंद महाराज, संत जाधव महाराज, संत जितेंद्र महाराज, संत सूर्यानंद महाराज, संत प्रभावती माई संत स्मृतीमाई, आश्रम ट्रस्ट चे अध्यक्ष श्री नंदकुमार सुर्यवंशी साहेब, श्री भगवानजी दौंड साहेब, सरचिटणीस श्री हनुमंतरावजी भोंगळे साहेब, विश्वस्त प्रकाशजी भट साहेब, श्री बाळासाहेब गोरडे साहेब, श्री प्रकाशजी गिरमे साहेब, श्री प्रभाकर जमदाडे श्री विठ्ठलराव होन साहेब, श्री विलास पाटील साहेब, श्री माधवराव देशमुख साहेब, श्री विष्णुपंत पवार साहेब, श्री उदयजी शिंदे साहेब , श्री जाधव भाई पावसिया साहेब. सौ. सुरेखाताई मोहिते पाटील, कमलताई पिचड आदिंची प्रमूख प्रक्रिया होती.
गुरुपौर्णिमच्या व्यवस्थेत आश्रमातील विविध विभागतील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी तसेच आत्मा मालिक शैक्षणीक संकुलाचे प्राचार्य, व्यवस्थापक, विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी भाविक यांनी मोलाचे योगदान दिले. तीन दिवस चाललेल्या या सोहळ्यात ध्यान योग मिशनच्या भजनी कलाकारवृंदा बरोबरच विविध भजनी मंडळींनी भजनातून आपली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित केली. उत्सवकाळा मध्ये पोलिस विभागा कडून विशेष सहकार्य मिळाले तसेच देशभरातील अनेक सत्संग मंडळांसह शेकडो भाविकांनी देखील या गुरूपौर्णीमा ऊत्सवात सहभागी होवून आत्मानंद प्राप्त करून घेतला.
