शिवसेना आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२१ ची कार्यकारिणी जाहीर:- राजेंद्र झावरे….

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी प्रमाणे शिवजयंती ३१ मार्च २०२१ रोजी आहे. कोपरगाव शहर शिवसेनेची शिवजयंती नेहमीच आगळे वेगळे सांस्कृतिक कार्यक्रम,मर्दानी खेळ, महामस्तक अभिषेक व भव्य मिरवणूक घेऊन व जनतेला काहीतरी बोध मिळेल या दृष्टीने जिल्हाप्रमुख राजाभाऊ झावरे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचा पायंडा गेल्या ४० वर्षांपासून शिवसेनेने पाडला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहर शिवसेना आयोजित शिवजन्मोत्सव सोहळा २०२१ कोरोनाचे सर्व नियम व अटी पाळून कसा साजरा करता येईल या संदर्भात कोपरगाव शहर शिवसेनेची मिटिंग काल जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली व शिवजन्मोत्सव २०२१ ची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

अध्यक्ष- रविंद्र शिंदे
उपाध्यक्ष- राहुल होन,अविनाश वाघ
कार्याध्यक्ष- नितीन राऊत
सचिव- राकेश वाघ
शिव ज्योतप्रमुख- अविनाश धोक्रट
या प्रमाणे निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *