सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्साहात साजरी…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात आज दिनांक 23 एप्रिल विश्वरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्ताने कोपरगाव वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दुपारी एक ते पाच वाजता सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती निमित्ताने सोलो डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये लहान गट व मोठा गट या गटातील मुला मुलींनी सहभाग घेऊन आपला नृत्यविष्कार सादर केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संघटक शरद खरात हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,जिल्हा संघटक अनिल बनसोडे, चरण त्रिभुवन, संतोष त्रिभुवन,तर कोपरगाव शिवसेनेचे भरत मोरे, असलम भाई शेख,सनी वाघ, डॉ. शिवाजी रोकडे,विनोद ठक्कर, प्रफुल्ल शिंगाडे,ऍड. शीतल देशमुख, ऍड. करुणा सोनवणे,शकील तांबोळी, नितीन बनसोडे,चंद्रकांत खरात राजेंद्र मोकळ,संजय त्रिभुवन, पवन पंजाबी,विजय कसलीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नृत्याविष्कार सादर करणाऱ्या मुला मुलींना वंचित बहुजन आघाडीचे वतीने ट्रॉफी व बक्षीस म्हणून भरीव रक्कम व सन्मानपत्र देण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दौलत शिरसाठ यांनी केले तर आभार अनिल बनसोडे यांनी मानले
या वेळी करिष्मा निकम,सुनिता पाटोळे,पाटील मॅडम, रजनी लासे, सुनिता मुंतोडे, सविता वाघ, ज्योती खरात, शारदा जाधव,शीतल गोडगे, सुनीता जगताप,पै.साईनाथ जाधव,वैभव राजगुरू, आकाश खरात, आदित्य, करण देवरे भालेराव, सुरेश त्रिभुवन,सिद्धेश खरात, चैतन्य खरात, भिमराज बनसोडे, आदित्य गोडगे,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमात कलाकारांनी लावणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर रचलेली गीते छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडे विविध महापुरुषांवरती असलेले गीते यावर नृत्याविष्कार करत इतिहास उजळून काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *