मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांचे शुभहस्ते बांधकामाचे भूमिपूजन संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(राहुरी विद्यापीठ):-
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे प्रस्तावीत असलेल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राची नवीन प्रशासकीय इमारत, शेतकरी प्रशिक्षण इमारत तथा अतिथीगृह आणि कर्मचारी निवासस्थान बांधकामाचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विद्यापीठ अभियंता श्री. मिलींद डोके, संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करतांना कुलगुरू डॉ. विलास खर्चे म्हणाले की पाडेगाव ऊस संशोधन केंद्र सन 2032 मध्ये शताब्दी वर्ष पूर्ण करणार आहे. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राच्या आतापर्यंतच्या गौरवशाली संशोधन कार्याची शासन स्तरावर नोंद घेवून सदरचे संशोधन केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे होण्यासाठी आवश्यक असणार्या प्रयोगशाळा तसेच प्रक्षेत्रावर विविध सुविधा, केंद्रावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी कर्मचारी निवासस्थान तसेच केंद्राला भेट देण्यासाठी येणार्या कृषि अधिकारी, ऊस कारखान्यांचे अधिकारी व शेतकरी यांची राहण्याची व्यवस्था, प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण केंद्रासाठी भरीव निधी शासनाने उपलब्ध करून दिला. मागील 93 वर्षापासून या संशोधन केंद्राने अधिक उत्पन्न आणि साखर उतारा देणारे 17 सुधारीत वाण प्रसारीत केलेले असनू अर्थिकदृष्टया किफायतशीर ऊस लागवड तंत्रज्ञानासंंबंधी 110 शिफारशी दिल्या आहेत. राज्यात ऊस लागवडीखालील असलेल्या एकूण 75 टक्के क्षेत्रावर या संशोधन केंद्राने प्रसारीत केलेल्या फुले 265 आणि को 86032 या दोन वाणांखाली क्षेत्र असून त्यामधून राज्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांना रू.1,00,787 कोटीचा निव्वळ नफा मिळालेला आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील ऊस शेती व त्यावर आधारीत साखर उद्योग यांच्या भरभराटीत या संशोधन केंद्राने मोठे योगदान दिले आहे.
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.ना.श्री. दत्तात्रय भरणे, माजी कृषीमंत्री मा. अॅड. माणिकराव कोकाटे यांचे सहकार्याने हा निधी उपलब्ध झाला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व पुणे येथील महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तथा सेवा प्रवेश मंडळाचे अध्यक्ष श्री. तुषार पवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा, कृषिच्या उपसचिव श्रीमती प्रतिभा पाटील यांचे सहकार्य आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, माजी संशोधन संचालक, डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *