सुरेगाव सोसायटीच्या अटीतटीच्या निवडणुकीत आमदार काळे व परजणे गटाचा धुव्वा, धनशक्तीला जनशक्तीच्या सभासदांनी चांगलीच चपराक दिली., कोल्हे गटाचे सर्व उमेदवार विजयी…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनीधी:-
तालुक्यातील सुरेगांव सोसायटीची निवडणुक आमदार आशुतोष काळे यांनी अत्यंत प्रतिष्ठेची केली होती, त्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाउन टिकेचा प्रयत्न झाला, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या विचारांच्या ५० ते ६० सभासदांच्या मतदानाचा हक्क हिरावला मात्र सभासदांनी या सर्व भुलथापांना चपराक देत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सुरेगांव सोसायटीच्या निवडणुकींत कोल्हे गटाच्या जनसेवा प्रणित विकास पॅनलने घवघवीत यश संपादन करून सर्व तेरा जागेवर विजय प्राप्त करत आमदार काळे व परजणे गटाचा धुव्वा उडविला आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्यांचे संचालक विलासराव वाबळे व माजी संचालक मोहनतात्या वाबळे यांनी या विजयात मोलाची कामगिरी बजावली.
विजयी उमेदवारांत कोल्हे गटाचे सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे संचालक विलासराव वाबळे, गणेश वाबळे, सर्जेराव वाबळे, पंकज निंबाळकर, प्रशांत वाबळे, राजेंद्र वाबळे, गोरख कदम, सोपानराव कदम, शंकरराव कदम, कुमार मेहेरखांब, कुसुमबाई वाबळे, रंजना कदम, राजेंद्र हळनोर यांचा समावेश आहे तर कोसाकाचे संचालक राजेंद्र मेहेरखांब, गोदावरी दुध संघाचे संचालक भाउसाहेब सुंदरराव कदम, सुरेगांव ग्रामपंचायतीचे लोकनुिक्त सरपंच शशिकांत भानुदास वाबळे, गौतम सहकारी बँकेचे संचालक नामदेव बाबुराव कोळपे, जिनींग प्रेसींगचे संचालक शिवाजीराव वाबळे यांचे सुपुत्र संजय वाबळे यांच्यासह काळे गटाच्या सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक नामेदव ठोंबळ यांनी, तर सुरेगांव सोसायटीचे सचिव शांताराम कदम यांनी सहायक म्हणून काम पाहिले. सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाला पात्र ठरत त्यानुरूप शेतक-यांच्या विकासासाठी बिपीनदादा कोल्हे व तत्कालीन आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्न करू असे विलासराव वाबळे म्हणाले. त्यांनी हा विजय सभासदांच्या चरणी समर्पित केला. विजयी उमेदवारांचे संजिवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक भैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे. सभासदांनी गुलालाची उधळण करत हा विजयोत्सव साजरा केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *