
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील खिर्डीगणेश येथील प्रगतशिल शेतकरी दशरथ भिकाजी वावरे (वय ७५) यांचे नुकतेच निधन झाले असुन .त्यांच्या पश्चात एक मुलगा, तिन मुली ,सुन,जावई,नातवंडे असा परिवार आहे.ते पत्रकार लक्ष्मण वावरे यांचे ते वडील होत.कै.दशरथ वावरे यांनी अतिशय कष्टाने आपले नाव लौकिक मिळविला होता त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेकांना मायेचा आधार दिला होता ते मुळातच अतिशय मनमिळाऊ व धार्मिक वारकरी पंथाचे असल्याने आपल्या मुलावर पण तसेच संस्कार केले मुलगा लक्ष्मण वावरे हे सुद्धा आपल्या वडीलांच्या पावलावर पाय ठेउन पुढे चालत आहे. कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे सदस्य, व दैनिक लोकमंथन , दैनिक पुण्यनगरी चे प्रतिनिधी श्री लक्ष्मण वावरे यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. अरुण गव्हाणे कोपरगाव प्रेस क्लबचे अध्यक्ष राजेंद्र सालकर, कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचेे उपाध्यक्ष शैलेश शिंदे कार्याध्यक्ष युसुफ रंगरेज, सचिव संतोष जाधव, प्राध्यापक साहेबराव दवंगे, , पत्रकार योगेश रुईकर, श्याम गवंडी, राहुल देवरे, वैभव शिंदे, मोबीन खान, हाफिज शेख, सिद्धार्थ मेहेरखांब सोमनाथ,सोनपसारे, रोहित टेके ,बिपिन गायकवाड दिलीप दुशिंग, दीपक जाधव, काकासाहेब खर्डे, अनिल दीक्षित, योगेश डोखे सुनील ससाने शंकर दुपारगुडे, मनोज जोशी, महेश जोशी, किशोर पाटणी , लक्ष्मण जावळे, गोरक्षनाथ वर्पे आदींनी शोक व्यक्त केला आहे.
