माजी आमदार सौ. स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रयत्नातून मंजुर झालेल्या करंजी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
माजी आमदार सौ स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे 9 चारी ते करंजी या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या या रस्त्याचे काम पूर्ण होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असल्याचे करंजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच रविंद्र आगवण यांनी सांगितले.
कोपरगाव वैजापूर मार्गावरील 9 चारी, राज्यमार्ग 65 ते करंजी गावापर्यंत जाणा-या ग्रामीण मार्ग 18 या रस्त्याची मोठया प्रमाणात दुरावस्था झाली होती. तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे यांचेकडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने या रस्त्याचे काम करण्यात यावे, त्यासाठी निधी मिळवून दयावा म्हणून मागणी केली होती. त्यानुसार ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून सौ कोल्हे यांनी सन 2017-18 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे 3 किलोमीटर अंतर असलेल्या या रस्त्यासाठी 1 कोटी 41 लाख 70 हजार निधी मिळवून दिला. तदनंतर करंजी येथे सौ स्नेहलताताई कोल्हे यांचे हस्ते सदर कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. हे काम अंतिम टप्प्यात असल्याने करंजी ग्रामस्थांचा दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागणार असुन शेतकरी, विदयार्थी तसेच दुध उत्पादक यांचा प्रवास सुखकर होणार आहे, श्री आगवन यांनी ग्रामस्थाच्या वतीने सौ कोल्हे यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *