

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेले
कोकमठाण, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल,

कोकमठाण मध्ये महाराष्ट्र शासनाच्या covid-19 लसीकरणाचा भव्य शुभारंभ गुरुवार दिनांक 4 /3 /2021 रोजी

मा.श्री फुलसौंदर साहेब वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कोपरगाव, मा.श्री प्रशांत सरोदे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी कोपरगाव नगरपरिषद, मा. श्री वासुदेव देसले साहेब पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, मा.श्री दौलतराव जाधव साहेब पोलीस निरीक्षक कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशन , मा. श्री विधाते साहेब तालुका आरोग्य अधिकारी कोपरगाव, मा.श्री हिरालाल महानुभव साहेब, मा. श्री चांगदेवरावजी कातकडे साहेब अध्यक्ष राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन, मा.श्री प्रसादजी कातकडे साहेब कार्यकारी संचालक, श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वांना कोरोना संदर्भात माहिती आणि घ्यावयाची काळजी तसेच मास्क, सॅनिटायझर चा वापर करून आणि लग्न समारंभ किंवा गर्दी चे ठिकाण टाळून प्रशासनाला योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी बोलताना कोपरगाव तालुका वैद्यकीय अधीक्षक श्री फुलसौंदर साहेब यांनी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल प्रशासनाचे आणि येथील सर्व वैद्यकीय सुविधांचे कौतुक केले आणि शासनाच्या या कोविंड 19 लसीकरणा संबंधित संपूर्ण माहिती यावेळी उपस्थितांना दिली व कोपरगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिकांपासून लसीकरण मोहिमेला यावेळी सुरुवात करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल च्या वतीने सर्व उपस्थित कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि सर्व ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले.
