
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव येथील जेष्ठ पत्रकार आणि प्रेस फोटो ग्राफर रफिक फुलमोहम्मद रंगरेज (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने आज दिनांक ५ मार्च २०२१ रोजी पहाटे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले.
रफिक रंगरेज हे कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक सदस्य तसेच माजी अध्यक्ष होते . त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. पत्रकार युसुफ रंगरेज यांचे ते बंधू होत .
