Sc आरक्षण वर्गीकरण शिर्डी येथे बैठक:- अँड.नितिन पोळ…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
Sc आरक्षण वर्गीकरण या मागणीसाठी दहा लाख सह्यांच्या मोहिमेचे आयोजन केले असून या विषयावर शिर्डी येथे महत्व पूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की अनुसूचित जाती मध्ये समाविष्ट असलेल्या जातींना आरक्षणाचा समान लाभ मिळत नाही त्यामुळे या जातींमध्ये सामाजिक व आर्थिक विषमता निर्माण झाली आहे
अनुसूचित जाती आरक्षणाचे सर्व लाभ वंचित जातींना समान लाभ व्हावा म्हणून अनेक उपेक्षित जाती मागणी करत आहेत त्या करिता विविध आंदोलने, निवेदने मोर्चे काढून सरकार कडे मागणी करत आहे मात्र मागील काही दिवसांपूर्वी लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्रा रामचंद्र भरांडे यांनी या बाबत अनेक समाज व संघटना यांच्या सोबत चर्चा करून “sc आरक्षण वर्गीकरण कृती समितीची” स्थापना केली या लढ्यात मातंग,मांग गारुडी, मादगी,डोर डक्कलवार आदी लाभ वंचित जाती एकत्र येऊन दहा लाख सह्यांचे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले त्यासाठी औरंगाबाद, नागपूर, अमरावती, नाशिक येथे बैठक घेण्यात आली
शनिवार दि ६/२/२०२१ रोजी संपूर्ण दिवसभर साई पालखी निघोज (शिर्डी) येथे प्रा रामचंद्र भरांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीत जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *