

कोपरगाव प्रतिनिधी:-
शारदा संगीत विद्यालय कोपरगाव येथे घेण्यात आलेल्या शास्त्रीय व सुगम संगीत परीक्षांचा निकाल नुकताच लागला. यात विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना शारदा संगीत विद्यालयाचे संचालक श्री. केतन कुलकर्णी व सौ. दीपाली कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.

शास्त्रीय संगीत परीक्षांमध्ये मध्यमा प्रथम (तबला वादन) परीक्षेत प्रसाद शालिग्राम यास प्रथम श्रेणी प्राप्त झाली. तर तनिष्का बिरुटे (हार्मोनियम) हिला प्रवेशिका प्रथम परीक्षेत विशेष श्रेणी प्राप्त झाली.
सुगम संगीत परीक्षांमध्ये बाल विभागात गायन विषयाच्या प्रथम परीक्षेत अद्विता बोधे, स्वरा जोरी, शर्मिला धारणगावकर जान्हवी वाणी, प्रग्यान बोरा यांना विशेष श्रेणी प्राप्त झाली. तर हार्दिक बोरा आणि राधिका वाके यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली. द्वितीय परीक्षेत ओवी पाटील हिने विशेष श्रेणी संपादन केली. तृतीय परीक्षेत रघुनाथ लोंगाणी यास प्रथम श्रेणी प्राप्त झाली. चौथ्या परीक्षेत क्रिया पोरवाल हिला विशेष श्रेणी तर साची भट्टड, गायत्री कापरे व सोनीशा साखरे यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली. बाल विभागाच्या सहाव्या परीक्षेत दूर्वा परिख हिने विशेष श्रेणी मिळवली.
सुगम संगीत गायन मोठ्या विभागात प्रथम परीक्षेत डॉ. अनघा महाजन डॉ. वैशाली भोसले यांनी विशेष श्रेणी संपादन केली. तृतीय परीक्षेत नेतल काबरा हिला प्रथम श्रेणी तर चौथ्या परीक्षेत डॉ. पल्लवी बुब ह्या प्रथम श्रेणीत व वर्षा धामंदे या द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. हार्मोनियम / कॅसिओ वादन विभागामध्ये पहिल्या परीक्षेत वेदांश बूब, अथर्व बुब, कृष्णव पटेल, हार्दिक बोरा या सर्वांनी विशेष श्रेणी प्राप्त केली. तिसऱ्या परीक्षेत आर्यन कपिले याने विशेष श्रेणी तर चौथ्या परीक्षेत भाविका धाडीवाल हिने विशेष श्रेणी मिळवली.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कोपरगाव व आसपासच्या परिसरातून कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे.
