कोपरगावात दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अलिम्को मोजमाप व फिजीओथेरपी शिबीर संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी :- समावेशित शिक्षण विभाग, पंचायत समिती कोपरगाव आयोजित दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी आवश्यक साहित्य साधने मोजमाप शिबीर (अलिम्को) आज दिनांक 03/10/2026 रोजी लायन्स मूकबधिर व अपंग विद्यालय, कोपरगाव येथे उत्साहात पार पडले.
दिव्यांग विद्यार्थ्यांना तपासण्यासाठी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग, नवी दिल्ली यांची स्वायत्त संस्था अलिम्को (ALIMCO), जबलपूर यांच्या तज्ञ पथकामार्फत ADIP-SSA समग्र शिक्षा योजनेअंतर्गत सन 2026-27 करिता हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. कोपरगाव तालुक्यातील सर्व केंद्रांतून 130 दिव्यांग विद्यार्थी या शिबिरासाठी उपस्थित होते.
सदर शिबिरासाठी P&O (ऑर्थोपेडिक) तज्ञ डॉ. संकेत दरवणकर, EDP तज्ञ वीरेंद्र राठोड व Fabricating तज्ञ कुणाल सिंग यांचे पथक लाभले. त्यांनी विद्यार्थ्यांची सविस्तर तपासणी करून आवश्यक सहाय्यक साहित्यासाठी मोजमाप केले.

सदर अलिम्को शिबिराचे संनियंत्रण पंचायत समिती शिक्षण विभाग, कोपरगावच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती पिंकी वाजे मॅडम, विस्ताराधिकारी श्रीमती शबाना शेख मॅडम व विस्ताराधिकारी श्रीमती संजीवनी आंबिलवादे मॅडम यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. गटशिक्षणाधिकारी श्रीमती पिंकी वाजे मॅडम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा समन्वयक श्रीमती श्रद्धा मोरे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
केंद्रस्तरीय विशेष शिक्षक सौ. सुवर्णा मगर, श्री. कांतीलाल गुरसळ, श्री. सचिन म्हस्के, श्री. अमित रणधीर, श्री. राजेंद्र पाखरे, काळजीवाहक प्राथमिक स्तर श्रीमती सुजाता वर्पे व माध्यमिक स्तर काळजीवाहक श्रीमती नितल आहेर यांनी अलिम्को टीमचे स्वागत केले व शिबिरातील पालक-विद्यार्थी बैठक व्यवस्था करून आवश्यक समुपदेशन व मार्गदर्शन केले. सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांची उपस्थिती पत्रक भरून आवश्यक कागदपत्रे जमा करून घेतली.
तसेच या शिबिरासाठी श्री. सुनील संवत्सरकर सर यांचे आवश्यक तांत्रिक सहाय्य लाभले. दिव्यांग प्रमाणपत्र नसलेल्या विद्यार्थ्यांचे PART-A फॉर्म भरून घेतले. अलिम्को डॉक्टर पथकाबरोबर रेफर झालेल्या विद्यार्थ्यांची नोंद घेऊन पालक-विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.
अलिम्को शिबिरामध्ये उपस्थित दिव्यांग विद्यार्थ्यांना राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फिजीओथेरपी कॉलेज मार्फत फिजीओथेरपी सेवा देण्यात आली.
तसेच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे ऑडिओग्राम काढण्यासाठी श्रीमती भारती जपे मॅडम व NRHM टीमच्या सर्व डॉक्टर टीम यांनीही आवश्यक सहकार्य केले.
शिबिरासाठी आवश्यक वर्गखोल्या, लाईट, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लायन्स मूकबधिर व अपंग विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एकनाथ गोलवड सर व त्यांच्या संपूर्ण टीम यांनी मोलाचे सहकार्य केले.
उपस्थित सर्वांच्या सहकार्याने तालुक्यातील अलिम्को शिबीर मोठ्या संख्येने दिव्यांग विद्यार्थी-पालक उपस्थित ठेवून यशस्वी करण्यात आले.
