कोपरगांव बाजार समितीकडून शेतक-यांना विनामुल्य़ पीक विमा,, तालुक्यातील शेतक-यांनी लाभ घेण्याचे आवाहन सभापती श्री. साहेबराव किसनराव पा. रोहोम….

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी कृषि उत्पन्ऩ बाजार समितीकडून विनामुल्य़ प्रधानमंत्री पिक विमा काढून देण्यात येत आहे. तालुक्यामध्ये सीएससी सेंटरवर किंवा सायबर कॅफेमध्ये शेतक-यांकडून पिक विमा भरून देण्याचे शुल्क़ घेतले जाते. त्यामुळे शेतक-यांची आर्थिक बचत व्हावी या उद्देशाने येथील कृषि उत्पन्ऩ बाजार समितीच्या वतीने पिक विमा काढून देण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे.
याकरीता शेतक-यांनी आधार कार्ड व बँक पासबुकची झेराक्स़, स्वयंघोषणापत्र, शेतीचा सातबारा उतारा ही कागदपत्रे आवश्य़क आहेत. तालुक्यातील जास्तीत जास्त़ शेतकरी बांधवांनी कोपरगांव कृषि उत्पन्ऩ बाजार समितीमध्ये संपर्क साधून आपला पिक विमा काढून घ्यावा, शेवटच्या दिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी आपल्या पिकाचा विमा अंतिम मुदतीच्या आतच काढावा, असे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. साहेबराव किसनराव पा. रोहोम, उपसभापती श्री. गोवर्धन बाबासाहेब पा. परजणे व सचिव श्री. एन.एस. रणशुर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *