
कोपरगाव प्रतिनिधी:-राष्ट्रीय चर्मकार महासंघ कोपरगावच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे शहरात क्रांतिकारीसंत संतशिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पालखीला सुरुवात झाली रविदास महाराजांच्या नामाचा जयघोष करत ,फुगड्या ,भजने गात पालखीचे समाज मंदिरात आगमन झाले तदनंतर ह. भ. प .भानुदास महाराज रोहम बोलकीकर यांचे रविदास महाराज यांचे जीवनावरील प्रवचन झाले
माघ पौर्णिमेला झालेल्या या कार्यक्रमात रविदास महाराज यांचे विधिवत पुजन आरती करण्यात आले उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे व समाज बांधवांनी दर्शन पुजन व आरती करुन महाप्रसाद घेतला
सालाबादप्रमाणे पुढील वर्षासाठी अन्नदानाची चिठ्ठी काढण्यात आली ती रवंदा येथील संतोष लक्ष्मण बनसोडे यांची निघाली त्यांचा व चालुवर्षी अन्नदान देणारे सवंत्सर येथील सौ रुख्मिणीबाई तिरमखे,श्री बबनराव तिरमखे,संदीप तिरमखे, बापु तिरमखे यांचा सत्कार करण्यात आला
समाजातील विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी सभामंडप कामासाठी निधी उपलब्ध करून दिला होता व गेल्या ३५ वर्षांपासून कोल्हे कारखाना साखर पोते देत असते त्याबद्दल त्यांचे व विद्यमान आमदार आशुतोष दादा काळे यांनी वॉल कंपाऊंड कामासाठी दहा लक्ष रुपये निधी देऊन काम पुर्ण केल्या बद्द्ल समाजाच्या वतीने दोघांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले
यावेळी झालेल्या कार्यक्रमात आमदार आशुतोष दादा काळे,बिपिन दादा कोल्हे, राजेशजी परजने,सौ सरस्वतीताई वाकचौरे ,दिल्ली उच्च न्यायालाय येथे कार्यरत असणारे अँड सुमित पाचखंडे आदींनी मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या राष्ट्रीय चर्मकार महासंघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी प्रास्तविक केले,आभार संजय दुशिंग यांनी मानले तर सूत्रसंचालन वसंतराव थोरात यांनी केले
राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीपराव कानडे,महिला राज्य कार्य सदस्या सौ, स्नेहाताई दिलीप कानडे,वसंतराव थोरात, संजय सरवार,संतोष शिंदे,भैया कानडे, तालुका कार्यध्यक्ष अँड रमेश दुशिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले तर एम डी कानडे, डी आर दुशिंग, पोटे मेजर, भाऊसाहेब कानडे ,अण्णासाहेब तिरमखे यांचे हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे सर्वेसर्वा बिपिनदादा कोल्हे ,आमदार आशुतोष दादा काळे, महानंदा चे नवनिर्वाचित चेअरमन राजेश आबा परजने ,नवनिर्वाचित सरपंच सुनिता बनसोडे,मढी चे सरपंच सुनिल भागवत यांचे सह


गोवा राज्य सरकारचा मानाचा शिक्षण रत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल कन्या विद्यालय कोपरगाव च्या आदर्श मुख्याध्यापीका सौ मंजुषा ताई सुरवसे मॅडम यांचा आमदार आशुतोष दादा काळे यांचे हस्ते ट्रॉफी,शाल, श्रीफळ, हार देऊन चर्मकार समाज्याच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आला
यावेळी नगरसेवक मा संदीप भाउ वरपे,करीम कुरेशी,रोहीत वाकचौरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल गांगुले,राजेंद्र वाकचौरे, नगरसेवक विरेन बोरावके, वाल्मिक लहिरे,राज्य कार्यकारणीनी सदस्य एम डी कानडे,माजी तहसीलदार डी आर दुशिंग,उपजिल्हाध्यक्ष देविदास कानडे, जिल्हा सचिव संजय पोटे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग , शहर अध्यक्ष गणेश कानडे, संजय कानडे, रमेश मगरसर , संकेत कानडे,वसंतराव थोरात, विकास थोरात, कैलास सातपुते,कृष्णा सातपुते, सागर सातपुते,गोरख कानडे, पै.बाळासाहेब वानखेडकर , संतोष दळवी, संतोष बारसे, कैलास बोरावके, आंबेडकरसर, भाऊसाहेब कानडे, सुभाष पोटे, संतोष कानडे, सागर पोटे, सुशांत कानडे, अनिल कानडे, संतोष बनसोडे, नानासाहेब बनसोडे, राजु वाघ,गोरख कडू, किसनराव कानडे, योगेश मगर, वसंतराव भागवत ,योगेश बारसे,कुंडलिक शिरसाठ, संजय कानडे, जगन कानडे,वसंत भागवत, वसंत कांबळे, सौ. जयश्री कानडे,सौ उज्वला कानडे, सौ.नीता सातपुते,सौ म्हैसमाळे संख्येने उपस्थित होते
