राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत तृतीयक्रमांक पटकावत सोमैय्या शाळेचे मोठे यश…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अहमदनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करत सोमय्या विद्यामंदिर साकरवाडीच्या मुलींच्या संघाने अभूतपूर्व यश मिळवत राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे या यशामुळे विजयी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे


ग्रामीण भागातील असुनही या विद्यार्थिनींनी सोमैय्या शाळेचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात वाढवला आहे हे यश अभूतपूर्व असुन या यशाचे खरे श्रेय संस्थेचे अध्यक्ष प्रसिद्ध उद्योगपती समीरजी सोमैय्या यांचे असून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळण्या साठी वारी साकरवाडी सारख्या ग्रामीण भागात सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्यानेच हे यश मिळाले असल्याचे प्रशिक्षक संजय अमोलिक सर यांनी सांगितले
गोदावरी बायो रिफायनरीज लिमिटेड साकरवाडीचे संचालक सुहासजी गोडगेसाहेब व व्यवस्थापनातील पदाधिकारी नेहेमीच खेळासाठी सर्व प्रकारची मदतदेण्या साठी तत्पर असतात त्यामुळेच आम्ही हे यश मिळवले असल्याचे विजयी संघातील खेळाडूंनी सांगितले


सोमैया स्पोर्ट्स अकॅडमी चे प्रमुख एजाजसर व त्यांची पूर्ण टीम जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिल्ले, विशाल गर्जे मिलिंद कुलकर्णी तसेच प्राचार्या सुनीता पारे, पर्यवेक्षक श्री खळदकरसरआणि सोमैय्या शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका यांचेही मार्गदर्शन नेहमीच लाभते.


सर्व खेळाडूंना प्रशिक्षक संजय अमोलिक सर अनेक वर्षापासून रोज सकाळ संध्याकाळ अशा दोन सत्रांत बॅडमिंटन, टेबल टेनिस, क्रिकेट या खेळांचे प्रशिक्षण देत आहेत देश पातळीवर आमच्या सोमैय्या शाळेचे खेळाडू चमकावेत असे स्वप्न असुन ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रशिक्षक संजय अमोलिक सर यांनी यावेळी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *