Uncategorized

के. जे. सोमैया महाविद्यालयातील स्वयंसेवकांचा पुणे ते पंढरपूर आषाढी वारीमध्ये सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित पुणे ते पंढरपूर आषाढी वारीनिमित्त ‘स्वच्छ वारी-स्वस्थ वारी-निर्मल वारी-हरित वारी’ या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दि. ९ ते २५ जुलै २०२६ या कालावधीत संपन्न झालेल्या या दिंडीमध्ये कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक सौरव बाबासाहेब जाधव व सार्थक राजु दवंगे यांनी विद्यापीठाच्या वतीने पालखीसोबत सहभागी होऊन आपला सक्रिय सहभाग नोंदविला. राज्यस्तरीय ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र दिंडी’ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात या दोनही स्वयंसेवकांनी विद्यार्थी ग्रुपचे नेतृत्व करताना या कालावधीत दिंडीत सहभागी वारकरांची सेवा, भक्तांचे आरोग्य, त्यांच्या मुक्कामी राहण्याची व्यवस्था व तेथील परिसर स्वच्छतेचे काम केले. या सेवेतून सामाजिक बांधिलकी जपत या स्वयंसेवकांनी कडेपठार येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. पालखी सोहळ्यात माऊलीच्या जयघोषाबरोबरच अभंग, भक्तिगीते व भारूड सादरीकरण करण्यात आले. सौरव जाधव व सार्थक दवंगे यांनी या सामाजिक उपक्रमांत घेतलेल्या सहभागाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीपराव रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) विजय ठाणगे यांच्या हस्ते या दोनही स्वयंसेवकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी. एस. गायकवाड, प्रो. (डॉ.) संजय दवंगे, रजिस्ट्रार डॉ.अभिजित नाईकवाडे हे उपस्थित होते. या वारीमध्ये सर्वच स्वयंसेवकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. गणेश भामे, जिल्हा समन्वयक डॉ. गणेश निमसे, डॉ. सुनील मोहटे, डॉ. प्रताप फलफले, मा. दिनेश जाधव, निलेश कडू, मा. ऋषिकेश चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.1

  1. ↩︎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *