अनिल वाघमारे यांची डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी नियुक्ती…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(पुणे):- मराठी पत्रकार परिषदेचाच एक उपक्रम असलेल्या डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष म्हणून बीड जिल्ह्याचे सुपूत्र आणि डोंगरचा राजा या चॅनलचे संपादक अनिल वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे..
ही नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल..
मराठी पत्रकार परिषदेनं डिजिटल मिडिया परिषद ही स्वतंत्र विंग सुरू केली आहे.. राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये डिजिटल मिडिया परिषदेच्या शाखा सुरू करण्यात आलेल्या आहे.. युट्यूब चॅनल्स, आणि पोर्टल च्या संपादकांना डिजिटल मिडिया परिषदेचे सदस्य करून घेतले जात असून दोन हजारांवर डिजिटल पत्रकार परिषदेबरोबर जोडले गेले आहेत.. उर्वरित जिल्ह्यात डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याची जबाबदारी अनिल वाघमारे यांच्यावर सोपविली जात आहे.. सर्व जिल्ह्यात शाखा सुरू झाल्यानंतर राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याचे परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी स्पष्ट केले आहे..
अनिल वाघमारे गेली २० वर्षे पत्रकारितेत आहेत.. डोंगरचा राजा हे वर्तमानपत्र आणि युट्यूब चॅनल ते वडवणी येथून चालवत असतात.. ग्रामीण भागातील पत्रकारास राज्याचे नेतृत्व करण्याची संधी प्रथमच मिळत आहे..
एस.एम देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांनी अनिल वाघमारे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *