कधी चालू होणार इंदिरापथ रोड चे काम :- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
खंदक नाला , बस स्टँड मेन रोड प्रमाणे सर्वात जास्त रहदारीचा असणारा संभाजीमहाराज पुतळा ते गोकुळ नगरी ते टाकळी नाका हा रोड मोठा करण्यासाठी व मजबुती करून डांबरी करणासाठी मोठा निधी नगरपालिका कडे असूनही दर्जेदार काम होत नाही , नगरपालिका करत नाही .ही मोठी खेदाची गोष्ट असून , तात्काळ रोड चे कामे रस्था मोठा करण्यासाठी रस्त्यामध्ये आलेले असलेले अतिक्रमण काढून लवकर काम पूर्ण करावे.

या रोड वरून , शाळा , हॉस्पिटल , धान्यमार्केट साठी , तसेच शहरालगतील असलेले नगरे या भागातील लोक ह्या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.जणूकाही निधी असून दर्जेदार व काम पूर्ण न करणे हे नगरपालिकेचे जणू काही ब्रीद वाक्य झाले.जनतेला वेठीस धरायचे यात काय मोठे पन मिळते नगरपालिकेचे हेच समजत नाही.जनतेला काम चालू करा हे सांगावे लागते हे दुर्दैव आहे.याचाचा अर्थ पालिका प्रशासनाला जनतेला होणाऱ्या त्रासाचा काही देणेघेणे नाही असा होतो. थंडी चे दिवस चालू झाले आहेत , धूळ आणि खडीचा रोड या मुळे लहान मुले ते जेष्ठ नागरिक यांना त्रास होत आहे. खडी वरून लोक पडत आहे , कधी खडी उडून लोकांना लागत आहे. गोकुळनगरीचा पुलाचे काम माघे झाल्यावर पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्था डांबरी करणं नं करता तसाच सोडून दिला होता.तसेच गोकुळनगरीच्या वळणावर रस्ता खूप छोटा असून तेथील खड्यतून व असणारा विचित्र स्पीड ब्रेकर यातून गाडी काढणे खूप आवघड झाले आहे. टाकळी नाका ते कोळपेवाडी पेट्रोल पंप परियंत ही खूप खड्डे झाले आहेत व धूळ उडत आहे. तरी तात्काळ हे कामे नगरपालिकेने चालू करून दर्जेदार करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *