कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतचा निवडणुकीचा धुराळा लवकरच उडणार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य यांचा कार्यकाल साधारणपणे ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत संपत असून राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग निहाय मतदार याद्यांचा कार्यक्रम नुकताच जाहीर केला आहे त्यानुसार शुक्रवार दिनांक 18 11 2022 रोजी तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करावयाची आहे तर सोमवार दिनांक 28 11 2022 ते शुक्रवार दिनांक 02 12 2022 सकाळी 11 ते दुपारी 03 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागवयाचे व सादर करावयाचे आहे तर सोमवार दिनांक 05.12.2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशन पत्र छाननी करण्यात येणार असून ही छाननी सकाळी 11 वाजेपासून ते छाननी संपेपर्यंत सुरू राहील तसेच बुधवार दिनांक 07.12.2022 रोजी दुपारी 03 वाजेनंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम कालावधी असेल त्याचप्रमाणे रविवार दिनांक 18.12 2022 रोजी सकाळी 07.30 वाजेपासून ते सायंकाळी 05.30 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून मंगळवार दिनांक 20.12.2022 रोजी मतमोजणी व निकाल घोषित करण्यात येईल तसेच जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना शुक्रवार दिनांक 23 12 2022 रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतीचा कार्यकाल डिसेंबर अखेर संपत असून त्या ग्रामपंचायती पुढिल प्रमाणे
१) डाऊच बुद्रुक
२) डाऊच खूर्द
३) चांदेकसारे
४) देर्डे- कोऱ्हाळे
५) सोनेवाडी
६) रांजणगाव देशमुख
७) वेस-सोयेगाव
८) कोळपेवाडी
९) वडगाव
१०) चासनळी
११) मोर्विस
१२) माहेगाव देशमुख
१३) शहापूर
१४) बहादराबाद
१५) तळेगाव मळे
१६) हंडेवाडी
१७) बक्तरपूर
१८) बहादरपूर
१९) खोपडी
२०) शिगंणापुर
२१) कंरजी बुद्रुक
२२) भोजडे
२३) सडे
२४) धारंणगाव
२५) पढेगाव
२६) खिर्डी गणेश
या ग्रामपंचायतीचा समावेश असून या प्रभाग रचना व आरक्षण प्रक्रिया पूर्ण झालेली असून राज्य निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक असणारी प्रभाग निहाय मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम नुकता जाहीर केला असून मतदार यादी तयार करण्यासाठी 31 मे 2022 ला जी यादी अस्तित्वात आली होती तीच यादी ग्राह्य धरली असून 18.11.2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *