

कोपरगाव शहरातील जुन्या गांवठाण भागातील श्री मुरलीधर मंदिरात परंपरागत पध्दतीने श्री गोरक्षण महिला भजनी मंडळाचे वतीने आयोजन करण्यात आले होते.
आश्विन पौर्णिमा पासून काकडा सुरु करण्यात येते.कार्तिक पौर्णिमा पर्यंत काकड आरती केली जाते.कार्तिक स्नानाने काल्याची समाप्ती होते.काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी आरती करतात. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात.
भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते.महाराष्ट्रामध्ये बहुतांशी मंदिरातून नित्य किंवा काही विशिष्टकाळात,विशेषतः कार्तिक महिन्यात काकड आरती केली जाते.


कार्तिक महिन्याच्या शुक्ल एकादशीपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत दररोज पहाटे देवाला जागविण्यासाठी मंदिरात काकडारती करण्याची पद्धत प्रचलित आहे.काकड आरतीत पंचपदी,हरापाठ, वासुदेव, आंधळा-पांगळा,जोगी,काकड्याची पहिली मालिका, राधाकृष्ण गजर,गवळण,विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये म्हटली जातात.संत तुकाराम, संत रामदास, संत एकनाथ, इत्यादी संतांनी काकड आरती रचल्या आहेत.
कोपरगाव शहरातील श्री गोरक्षण भजनी मंडळाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.जुने गावठाण भागात श्री मुरलीधर मंदिरात काकड आरती करण्यात येते.काकड आरतीच्या सांगतेला प्रसाद वाटप करण्यात आला आहे.श्री गोरक्षण महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा रजनीताई ठोंबरे यांचे सह सदस्य शेकडो सहकारी महिला यांचा उस्फुर्त सहभाग असतो.
