

कोपरगाव प्रतिनिधी:-
शहरातील गो रक्षण महिला भजनी मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त कुंभार गल्लीतील श्री जगदंबा माता मंदिराच्या आवारात भजन, जोगवा, देविचया भक्ती गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.
कोपरगाव शहरातील जुन्या गावठाणातील कुंभार गल्लीतील देवी म्हणून ओळखली जाणारी श्री जगदंबा माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त भाविक गर्दी करतात. मंगळवार, शुक्रवारी आणि रोज दैनंदिन पणे अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.
नवरात्र उत्सवानिमित्त पाठ, भजनी मंडळाच्या वतीने भजन, महिलांचा जोगवा आदि समारंभ संपन्न होत आहेत.
याचाच एक भाग म्हणून गो रक्षण महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक जेष्ठ महिला, भगिनींनी भजने गात वातावरण भक्तिमय झाले होते. अनेक भाविक भक्तीरसात डुंबून गेले होते. नवरात्र उत्सवानिमित्त नवु रसात नवा विषकारात भजन जोगवा संपन्न झाले.
