राष्ट्रपतींच्या हस्ते मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नाभिक समाजाचे व मुळचे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील नटरंग, फ्रॅन्डी फेम नाट्य-सिने अभिनेते, कवी मा.श्री किशोरजी कदम यांना एकाच वेळी ‘अवांच्छीत’ आणि ‘गोदाकाठ’ या मराठी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल संगमनेर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या गौरवास्पद गोष्टीचा आम्हां नाभिक समाजाला सार्थ अभिमान आहे असे म्हणून महाराष्ट्र राज्य नाभिक एकता महासंघाचे अध्यक्ष मा.श्री भगवानराव बिडवे यांनी विशेष कौतुक केले. तसेच प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे, साईभक्त श्री मनोजभाऊ वाघ, जिल्हाध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे, प्रवक्ते श्री किरण मदने, संगमनेर तालुकाध्यक्ष श्री किशोरभाऊ बिडवे, सलून तालुकाध्यक्ष श्री बाळकृष्ण वाघ, श्री संजयजी जाधव, श्री रंगनाथ बिडवे यांसह सर्व तालुका-जिल्ह्यातील पदाधिकारी व नाभिक समाज बांधवांकडून मा.श्री किशोरजी कदम यांचे मनःपुर्वक अभिनंदन व पुढील वाटचाली‌साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *