संजीवनीच्या २३ अभियंत्यांना मॅन एनर्जी व फोर्स मोटर्स मध्ये नोकऱ्या:- श्री अमितदादा कोल्हे…

Uncategorized

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची बहारदार कामगिरी…
कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काॅम्प्युटर इंजिनिंअरींग, इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी, मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या शाखांमधिल शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधिल अंतिम वर्षातील नवोदित अभियंत्यांची मॅन एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. व फोर्स मोटर्स या कंपन्यांनी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात दोन्ही कंपन्यांनी एकुण २३ नवोदित अभियंत्यांची आकर्षक पगारावर नोकऱ्यांसाठी निवड केली आहे. संजीवनीच्या विध्यार्थ्यांची एका पाठोपाठ एक अशा विविध कंपन्या निवड करीत असल्याने ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची बहारदार कामगिरी समोर असल्याची माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात श्री कोल्हे यांनी सांगीतले आहे की मॅन एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. या कंपनीने अक्षय सुरेश नळे, निखिल धनंजय निकाळे, शुभम राजेंद्र भवर, सोहम दत्तात्रय केंगे, चैतन्य सुनिल लोखंडे, भूषण प्रकाश मोरे, अनिकेत सुधाकर परजणे, प्रतिक रविंद्र पाटील, शंतनू देविदास झाल्टे, विनित सुनील बोकाडिया, आदर्शसिंग रतनसिंग राजपुत व वैष्णवी राधाकिसन सदाफळ यांची निवड केली आहे. फोर्स मोटर्स या कंपनीने पायल ज्ञानेश्वर दहिफळे, नीता बाबासाहेब गडाख, शीतल किशोर कोल्हे, माधव नागोराव चितळकर, संकेत नंदु दिघे, मयुरेश बापु गाडेकर, शुभम राजेंद्र खंबायते, रोशन सुभाष खंडारे, रविंद्र सुदाम कोते, आदित्य भावेश रावळ व कुमार शम्मी यांची निवड केली आहे.
मागील अनेक वर्षांपासून संजीवनी मधुन तयार झालेल्या अभियंत्यांना विविध नामांकित कंपन्यंमध्ये नोकऱ्या मिळत आहे. संजीवनी माजी विध्यार्थी तेथे प्रामाणिकपणे आपले काम करून आधुनिक तंत्रज्ञान अवगत करून कंपन्यांच्या वृध्दीसाठी कार्यरत असतात. त्यामुळे अनेक कंपन्याचे प्रतिनिधी संजीवनीच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटच्या विनंतीवरून संजीवनीमध्ये येतात व कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हच्या माध्यमातुन विध्यार्थ्यांना नोकऱ्या देतात, यामुळे ग्रामिण भागातील युवक युवतींना मोठी संधी प्राप्त होत आहे.

संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे , इंजिनीअरिंग कॉलेजचे डायरेक्टर डॉ . ए. जी. ठाकूर यांनी निवड झालेल्या विध्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

विध्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
‘मी राहाता येथिल रहिवासी असुन माझे वडील शेतकरी आहे. खरी तर मॅन एनर्जी ही जहाजांसाठी डीझेल इंजिन बनविणारी कंपनी आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग शाखेची विध्यार्थिनी. परंतु काॅलेजने मला साॅफ्टवेअरचे जे स्कील दिले त्यातुन माझी निवड झाली आणि संजीवनीमुळे माझे स्वप्न पुर्ण झाले.’-वैष्णवी सदाफळ
‘मी गणेशनगर येथिल शेतकऱ्याचा मुलगा आहे. काॅलेजने आमच्यासाठी खास इंग्रजी संभाषण कौशल्याचे धडे दिले, त्याचा मला खुप फायदा झाला. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने कंपनीच्या उत्पादनावर आधारीत स्पेशल सेशन घेतले, व माझी निवड झाली. माझे स्वप्न पुर्ण झाले.’-शुभम भवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *