कोपरगांव बेट नावधक्यावर धर्मध्वजाचे ध्वजारोहण संपन्न…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील गोदावरी नदीच्या दक्षिण तीरावरील बेट नाक्याजवळ नावधक्क्यावर राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामीट्रस्टचे संत परमपूज्य रमेशगिरी महाराजांच्या शुभहस्ते धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
दरवर्षी ह्या धर्मध्वजा चे ध्वजारोहण कार्यक्रम या कालावधीत करतात. ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन आणि नेतृत्वाखाली हे ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात येतो.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यास राज परदेशी,अक्षय पंडोरे,वैभव वायखिंडे,विकी गवळी,मंगेश परदेशी,यश कुलकर्णी,समर्थ वायखिंडे,सार्थक गिड्डे,कृष्णा गवळी यांनी विशेष परीश्रम घेतले.
या प्रसंगी श्री राजेंद्र पाखरे,स्वच्छता दुत व गोदामाई प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री.आदिनाथ ढाकणे, ब्राह्यण सभेचे जेष्ठ सदस्य संजिव देशपांडे,जयेश बडवे,राजेंद्र जवाद,विकास शर्मा,मुन्ना आव्हाड,बाळासाहेब पानगव्हाणे, राजाभाऊ गवळी,श्री.दीपक शिंदे,श्री.रविंद्र सुपेकर, श्री गणेश शिंदे,उपस्थित होते
शेवटी संयोजक श्री.बी. डी.कुलकर्णी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *