
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष श्री.विजयकुमारजी बंब यांचा वाढदिवस साजरा झाला हार्दिक शुभेच्छा
कॅलेंडरनुसार विजयकुमार बंब हे 75 वर्षाचे झाले असले तरी तरुणाला लाजवेल अशा उत्साहाने काम करतात.
स्व.छोटूभाऊ जोबनपुत्रा यांच्या पावलावर पाऊल ठेवून श्री.विजयजी बंब यांनी यशस्वीपणे “ज्येष्ठ नागरिक संघाची” धुरा सांभाळली कोपरगावातील कोणतेही सामाजिक काम असो,नवीन अधिकाऱ्यांचा सत्कार असो,कोणाचा वाढदिवस असो,कोणाचे उद्घाटन असो,गोरगरिबांना मेडिकलची मदत असो,गोर-गरीब विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचे वाटप असो विजय कुमारजी बंब आपल्या सहकाऱ्यां सह जातीने हजर राहतात.
पण त्यातल्या त्यात त्यांच मिश्कली बोलण सर्वांना हसावून जाते. कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे “कोपरगाव पंचक्रोशीत” नाव झाले आहे. कोणताही कार्यक्रम असो विजयजी बंब यांची धावपळ पाहण्यासारखी असते.
जैन समाजात असलेल्या धार्मिक कार्यक्रमात हे मोठ्या हिरा-रीने भाग घेतात अशा चिरतरुण श्री.विजयजी बंब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना..!
नारायणशेठ अग्रवाल कोपरगाव.
मो 9822630330
श्री.योगेश जोबनपुत्रा
